दिलजीत दोसांजचं कमाल ट्रान्सफॉर्मेशन, Jaswant Singh Khalra यांच्यावरील सिनेमासाठी लूक बदलला! पाहा फोटो
Diljit Dosanjh Transforms Into Jaswant Singh Khalra for Punjab 95 : दिलजीत दोसांझने पंजाब 95 या सिनेमातील त्याचा पहिला लूक प्रेक्षकांसाठी शेअर केलाय. या सिनेमात तो Jaswant Singh Khalra यांची भूमिका साकारणार आहे.

Diljit Dosanjh Transforms Into Jaswant Singh Khalra for Punjab 95 : अभिनेता दिलजीत दोसांजने आपल्या Punjab 95 या आगामी चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतलीये. त्याने Jaswant Singh Khalra यांच्यावर आधारीत सिनेमासाठी त्याचा संपूर्ण लूक बदललाय. या चित्रपटात तो दिवंगत मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांची भूमिका साकारतो आहे. पोस्टरमध्ये त्याचे हात बांधलेले आहेत आणि चेहऱ्यावर भाव अंगावर शहारे आणणारे आहेत. या पोस्टरमुळे त्याच्या सिनेमातील भूमिकेचा अंदाज येतोय. या पोस्टरने कमी कालावधीत लोकांचं लक्ष वेधून घेतलं असून, बराच काळ प्रलंबित असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा वळवलं आहे.
पंजाब 95 हा चित्रपट हनी त्रेहान यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी Moviesने सिनेमाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जसवंत सिंग खालरा यांच्या सत्यकथेनं प्रेरित आहे. 1980 आणि 90 च्या दशकात पंजाबमध्ये झालेल्या बेकायदेशीर हत्यांचा पर्दाफाश त्यांनी केला होता. मात्र, चित्रपटाच्या राजकीय विषयामुळे याला वादाचा सामना करावा लागत आहे. सेन्सॉर बोर्डाने सुमारे 120 बदलांची मागणी केली आहे, जे याच्या संवेदनशील विषयावर प्रकाश टाकते.

दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी या चित्रपटाचं वर्णन "सत्तेच्या विरोधात सत्य बोलण्याची किंमत आणि व्यवस्थात्मक क्रौर्याचं भयावह चित्रण" असं केलं आहे. या चित्रपटाचं प्रथम प्रदर्शन 2023 मध्ये टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार होतं. मात्र स्क्रीनिंगच्या काही वेळ आधीच हे रद्द करण्यात आलं. याची सुधारीत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही. ज्याचा परिणाम प्रदर्शनाच्या शक्यतांवर झाला. त्यांनी स्पष्ट केलं की जर हे बदल जबरदस्तीने लादले गेले, तर ते आपलं नाव या चित्रपटावरून काढून टाकतील. एका मुलाखतीत त्रेहान यांनी सांगितलं की, सेन्सॉर बोर्डाने असामान्य मागण्या केल्या आहेत – इतकंच नाही तर "पंजाब" शब्द देखील चित्रपटाच्या शीर्षकातून काढण्यास सांगितलं गेलं आहे, जरी हा चित्रपट पंजाबमधील सत्यकथेवर आधारित असला तरी.
या सर्व अडथळ्यांमुळेही दिलजीत दोसांजने चित्रपटाच्या प्रचारात सातत्य ठेवलं आहे आणि त्याच्या प्लॅटफॉर्मचा वापर करत लोकांची उत्सुकता कायम ठेवली आहे. पंजाब 95 ला अंतिम प्रमाणपत्राची प्रतीक्षा असताना, दिलजीत सध्या त्याच्या पुढील चित्रपट बॉर्डर 2 मध्ये व्यस्त आहे, ज्यात वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्यासोबत तो दिसणार आहे. दिलजीत शेवटचं सरदार जी 3 मध्ये दिसला होता, ज्यात पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमिरच्या भूमिकेमुळे देखील काही वाद निर्माण झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी'ने जीवन संपवलं, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, धक्कादायक कारण समोर!























