वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी'ने जीवन संपवलं, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, धक्कादायक कारण समोर!
Puducherry famous model San Rachel ended his life : वडिलांना भेटल्यानंतर सॅन रेचेलने गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांना तिला वाचवण्यात अपयश आले आहे.

Puducherry famous model San Rachel ended his life : एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 25 वर्षांची मॉडेल आणि मिस पुद्दुचेरी सॅन रेचेल हिने आत्महत्या केली आहे. झोपेच्या गोळ्या खाऊन तिने रविवारी आयुष्याचा शेवट केलाय. तिला JIPMER रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांना तिला वाचवण्यात अपयश आले. तिच्या निधनाच्या बातमीनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मिस पुदुचेरीच्या या टोकाच्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. (Puducherry famous model San Rachel ended his life)
वर्णद्वेषाविरुद्ध लढा दिला होता
सॅनने 2021 मध्ये 'मिस पुदुचेरी'चा किताब जिंकला होता. तिचं खऱ्या नाव शंकर प्रिया होतं. लहानपणीच तिने आपल्या आईला गमावलं होतं. आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी तिचा सांभाळ केला. त्यांनीच तिला मॉडेलिंग करण्यासाठी प्रोत्साहित केलं. इंडस्ट्रीतील गोऱ्या रंगाच्या ट्रेंडविरोधात वडिलांनी मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. (Puducherry famous model San Rachel ended his life)
तिच्या काळ्या त्वचेच्या रंगामुळे तिला मॉडेलिंगच्या करिअरमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. मात्र सगळ्या अडथळ्यांवर मात करून तिने 2019 मध्ये 'मिस डार्क क्वीन तामिळनाडू' आणि 2021 मध्ये 'मिस पुद्दुचेरी' हा किताबं तिने जिंकला होती. सॅन रेचेलने लंडन, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या देशांतील विविध मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठीही तिने जनजागृती केली होती.
सॅन रेचेल डिप्रेशनमध्ये होती
अलीकडेच तिचं लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ती मानसिक नैराश्यात (डिप्रेशन) होती. रिपोर्ट्सनुसार 5 जुलै रोजी तिने झोपेच्या गोळ्यांचे अधिक प्रमाणात सेवन केले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला पुद्दुचेरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पुढे शनिवारी तिला जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) येथे नेण्यात आलं, जिथे तिने अखेरचा श्वास घेतला. उरलैयनपेट्टई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सॅनने आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आपल्या ठाम विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सॅनने अशी आत्मसमर्पणाची भूमिका घेतल्याचं पाहून तिचे चाहते खूपच व्यथित झाले आहेत. पोलिसांना तिच्याजवळून कोणताही सुसाइड नोट मिळालेली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























