Horror Thriller Film: रिलीजच्या तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, बॉक्स ऑफिस गाजवतेय साऊथची 'ही' हॉरर थ्रिलर फिल्म; बाहुबली, थामा सगळे हिच्यासमोर फेल
Horror Thriller Film: प्रणव मोहनलालचा 'डाइस एरा' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या सिनेमानं आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे.

Horror Thriller Film: एका साऊथ सिनेमानं (South Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुरळा उडवून दिलेला आहे. तो साऊथ सिनेमा (South Film) म्हणजे, प्रणव मोहनलाल यांचा हॉरर थ्रिलर सिनेमा 'डाइस एरा'. हा सिनेमा सध्या रूपेरी पडद्यावर मोठ्या प्रमामात गाजतोय. या सिनेमाला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि हा आतापर्यंत बनवलेल्या सर्वोत्तम मल्याळम सिनेमांपैकी एक मानला जातो. प्रदर्शित झाल्यानंतर फक्त आणि फक्त तीनच दिवसांत या सिनेमानं भारतात 16.91 कोटी आणि जगभरात 25.5 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाच्या कलेक्शनबाबत (Box Office Collection) बोलायचं झालं तर, प्रणव त्याचे वडील मोहनलाल यांना काँटे की टक्कर देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बजेटपेक्षाही धुवांधार कमाई
प्रणव मोहनलालचा 'डाइस एरा' हा सिनेमा पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करतोय, फक्त भारतात 4.7 कोटींची कमाई करत होता. दुसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढून भारतात 5.7 कोटींची कमाई करत होता. तिसऱ्या दिवशी एकूण 6.35 कोटींची कमाई झाली. तीनच दिवसांत सिनेमानं भारतात 16.91 कोटींची कमाई केली. हा सिनेमा 12 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला आणि या सिनेमानं फक्त तीन दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली. दरम्यान, या सिनेमानं परदेशात 13.3 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकूण कमाई 25.57 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
2025 ची टॉप ओपनिंग फिल्म बनलीय 'डाइस एरा'
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या फिल्मसोबत प्रणव मोहनलाल आपले वडील मोहनलाल यांच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डच्या फिल्मला आव्हान देत आहे. त्यानं आपल्या वडिलांची फिल्म 'हृदयम'पेक्षा बंपर ओपनिंग केली आहे. ही फिल्म 2025 ची टॉप मल्याळम ओपनिंग फिल्म्समध्ये सामील झाली आहे. जर या फिल्मची कमाई आणखी वाढली, तर ही 2025 ची सर्वाधिक कमाई करणारी मल्याळम फिल्म बनेल.
थ्रिल आणि सस्पेन्स काठोकाठ भरलाय...
'डाइस एरा' फिल्मबाबत बोलायचं झालं तर, मल्याळम हॉरर थ्रिलर फिल्म आहे. ज्यामध्ये प्रणव एक मानसिकदृष्ट्या त्रस्त व्यक्ती आहे, जो स्वतःला मृत व्यक्तींशी बोलणारा एकमेव व्यक्ती मानतो, चित्रपटात तुम्हाला खूप रहस्य आणि थ्रिल पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























