समंथाने प्रपोझ केलं त्याचं दिवशी नागा चैतन्यने उरकला दुसरा साखरपुडा? शोभिता धुलिपालासोबत आयुष्याची नवी सुरुवात
Naga Chaitanya Sobhita Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या डेटिंगच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या, आता अचानक या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थिती गुपचूप साखरपुड उरकला आहे. अभिनेता नागार्जुन यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करत मुलाच्या साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या डेटिंगच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या, पण, या दोघांनी याबाबत कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता अचानक या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा
नागा चैतन्य आणि सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुत प्रभू यांचा घटस्फोट एकेकाळचा चर्चेतील विषय होता. या दोघांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या घटस्फोटाचीही चर्चा झाली. त्यांच्या लग्नानंतर काही काळाने त्यांच्या दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर अखेरीस हे दोघं कलाकार विभक्त झाले. या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या.
नागार्जुन यांनी शेअर केले खास फोटो
"We are delighted to announce the engagement of our son, Naga Chaitanya, to Sobhita Dhulipala, which took place this morning at 9:42 a.m.!!
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) August 8, 2024
We are overjoyed to welcome her into our family.
Congratulations to the happy couple!
Wishing them a lifetime of love and happiness. 💐… pic.twitter.com/buiBGa52lD
साऊथचे सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांनी मुला नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केलं आहेत. गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी यांचा साखरपुडा पार पडला. नागार्जुन यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांचा आज सकाळी 9:42 साखरपुडा पार पडला याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नवीन जोडप्याचं खूप खूप अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदासाठी शुभेच्छा. नवीन प्रेमाची सुरुवात".
समंथाने प्रपोझ केलं त्याचं दिवशी चैतन्यने उरकला दुसरा साखरपुडा?
#SamanthaRuthPrabhu Proposed Naga chaitanya On August 8 💔
— ꪆࣼꪒവᰢ͟།ᰈ།ໍ (@itz_sagaa) August 8, 2024
And He Is Now Getting Enggaged With #SobhitaDhulipala On August 8 💞#NagaChaitanya ..! pic.twitter.com/6Om7YnL2Gb
व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
नागार्जुन अक्किनेनी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते नवीन कपलसोबत पोज देताना दिसत आहे आणि दुसऱ्यामध्ये शोभिता चैतन्यच्या खांद्यावर डोकं ठेवतानाचा फोटो दिसत आहे. दरम्यान, एकीकडे या नवीन जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना समंथा आणि चैतन्य यांच्या संबंधित एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. ट्विटरवरील व्हायरल पोस्टमध्ये दाव करण्यात आला आहे की, समंथा रुत प्रभू हिने नागा चैतन्यला प्रपोझ केलं, त्याचं दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला नागा चैतन्यने शोभितासोबत साखरपुडा केला.
It's the date sam proposed him.
— Loga (@Loga_70) August 8, 2024
They wait for same date and engaged. pic.twitter.com/snVDeyR1zB
2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा विभक्त
नागा चैतन्य आणि समंथा रुत प्रभूची भेट 'ये माया चेसवा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्यातील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने धून धडाक्यात लग्न केलं. पण, त्यांच नातं जास्त काळ टिकलं नाही. नाग चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : KISS बाई KISS... निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस, अरबाजला जमलं नाही ते घनश्यामनं करुन दाखवलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
