Dhurandhar Box Office Collection: धुरंधरच्या वादळात ॲनिमलसह 10 मेगाब्लॉकबस्टर चित्रपटांची धूळदाण! दुसऱ्या शनिवारीही तुफान कमाई
‘धुरंधर’ लवकरच हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरू शकतो. बॉक्स ऑफिसवर सध्या तरी ‘धुरंधर’ला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही, असंच चित्र आहे.

Dhurandhar: बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर सध्या एकच नाव गाजत आहे ते म्हणजे ‘धुरंधर’. प्रदर्शित होऊन दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने वेगळाच इतिहास रचला असून, हिंदी सिनेसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणारा ‘धुरंधर’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातील पहिला चित्रपट ठरतोय. (Dhurandhar Box Office Collection)
दुसऱ्या शनिवारी ‘धुरंधर’ने तब्बल 53.70 कोटी रुपयांची कमाई करत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. याआधी हा विक्रम कोणत्याही चित्रपटाला गाठता आला नव्हता. या एका दिवसाच्या कमाईने ‘धुरंधर’ने ‘पुष्पा 2’, ‘छावा’, ‘स्त्री 2’, ‘अॅनिमल’, ‘जवान’ यांसारख्या मेगाब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
दुसऱ्या शनिवारी कोणता चित्रपट कमाईत अव्वल
दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर’ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ‘पुष्पा 2 (हिंदी)’ने 46.50 कोटी, तर तिसऱ्या क्रमांकावर ‘छावा’ने 44.10 कोटींची कमाई केली आहे. ‘स्त्री 2’ (33.80 कोटी), ‘अॅनिमल’ (32.47 कोटी), ‘गदर 2’ (31.07 कोटी), ‘जवान’ (30.10 कोटी), ‘सैयारा’ (27 कोटी), ‘बाहुबली 2 (हिंदी)’ (26.50 कोटी) आणि ‘द कश्मीर फाइल्स’ (24.80 कोटी) हे चित्रपटही या यादीत आहेत. मात्र, या सर्वांवर मात करत ‘धुरंधर’ने नवा बेंचमार्क सेट केला आहे.
धुरंधर’ला रोखणं कठीण! Box Office वर तुफान
दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड थांबायचं नाव घेत नाही. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी ‘धुरंधर’ने 34.70 कोटी, तर शनिवारी 53.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील एकूण नेट बॉक्स ऑफिस कमाई 306.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
HISTORIC, ONCE AGAIN... 'DHURANDHAR' OVERTAKES *ALL* FILMS ON *SECOND SATURDAY* – SETS A NEW BENCHMARK... #Dhurandhar is now competing head-on with the biggest blockbusters of #Hindi cinema.
— taran adarsh (@taran_adarsh) December 14, 2025
Yes, you read that right – the *second Saturday* collections of #Dhurandhar are the… pic.twitter.com/nZwIMp6UeF
तगडी स्टारकास्ट, दमदार कथा, जबरदस्त अॅक्शन आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे ‘धुरंधर’ सध्या प्रत्येक रेकॉर्ड मोडत आहे. ट्रेड तज्ञांच्या मते, येत्या दिवसांतही या चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. ‘धुरंधर’ लवकरच हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरू शकतो. बॉक्स ऑफिसवर सध्या तरी ‘धुरंधर’ला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही, असंच चित्र आहे.























