एक्स्प्लोर

Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका

Dhurandhar 2: चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, कारण यावेळी OTT प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे.

Dhurandhar 2 OTT Release:रणवीर सिंहचा (Ranveer Singh) ‘धुरंधर: द रिवेंज’ (Dhurandhar 2) हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून जगभरातील एकूण कलेक्शन 1800 कोटींच्या पुढे गेलं आहे. रिलीजपासूनच हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आता OTT वर चित्रपट पाहण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, कारण यावेळी OTT प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

चित्रपटाचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. मात्र, ‘धुरंधर 2’ भारतात जिओ हॉटस्टारवर (JioHotstar) प्रदर्शित होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. याबाबत चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे OTT वर रिलीज होणारं व्हर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या आवृत्तीपेक्षा अधिक लांब असणार आहे. त्यामुळे याला ‘अनकट व्हर्जन’ असंही म्हटलं जात आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2: द रिवेंज’ 14 ते 15 मे 2026 दरम्यान स्ट्रीमिंगला उतरणार होता. तो आता 4 जून 2026 ला OTT वर येणार आहे.  टाइम झोननुसार प्रेक्षक नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकतील. निर्मात्यांनी या व्हर्जनला ‘Undekha and Raw’ असं नाव दिलं आहे. मात्र, भारतात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार नाही.


Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका

भारतातील OTT राइट्स कोणाकडे?

भारतातील प्रेक्षक हा अ‍ॅक्शन ड्रामा फक्त जिओ हॉटस्टारवर पाहू शकतील. OTT व्हर्जनची लांबी जवळपास 3 तास 52 मिनिटे इतकी आहे, जी थिएटर रिलीजपेक्षा सुमारे 3 मिनिटांनी अधिक आहे. भारतात या चित्रपटाचे एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्क JioHotstar ने विकत घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा OTT  व्यवहार जवळपास 150 कोटी रुपयांत झाला असून अलीकडच्या काळातील भारतीय चित्रपटांसाठी झालेल्या सर्वात मोठ्या OTT डीलपैकी हा एक मानला जात आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

'धुरंधर द रिव्हेंज' चित्रपटाने प्रदर्शनाच्या 59 व्या दिवशी 1,796.80Cr रुपयांची कमाई केली. आदित्य धर, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, रणवीर सिंग, आर माधवन आणि संजय दत्त यांच्या 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळपास दोन महिने झाले आहेत . इतका काळ लोटल्यानंतरही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget