(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhoom 4 : धूम 4 चित्रपटामध्ये आमिर खान-ऋतिक रोशनला डच्चू, 'या' अभिनेत्याची निवड
Dhoom 4 Movie Lead Role : आदित्य चोप्राच्या धूम 4 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा असून मुख्य भूमिकेसाठी आमिर-ऋतिकऐवजी वेगळ्या अभिनेत्याची निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Dhoom 4 Movie Update : बॉलिवूडमधील सर्वात मोठी ॲक्शन ब्लॉकबस्टर फ्रेंचायझी धूम 4 ची सध्या चर्चा सुरु आहे. या फ्रेंचायझीच्या पहिल्या चित्रपटापासून ते तिसऱ्या चित्रपटापर्यंत सर्व सिनेमे सूपरहिट ठरले. यातील कलाकार आणि कथानक आणि प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवलं. आता प्रेक्षक आतुरतेने धूम 4 चित्रपटाची वाट पाहत आहेत. धूम 4 चित्रपटसाठी आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत.
धूम 4 मध्ये आमिर-ऋतिकला डच्चू
धूम 4 चित्रपटामध्ये बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान, अभिनेता रणवीर सिंह आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची नावे मुख्य भूमिकेसाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या आगामी भागात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसेल, हे जाणून घेण्याची सगळ्यानाच उत्सुकता होती. पण, आता या चित्रपटात यापैकी कोणताही अभिनेता झळकणार नसल्याचं बोललं जात आहे.
हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
आदित्य चोप्राची सर्वात मोठी फ्रेंचाइजी धूमची क्रेझ आजही कायम आहे. धूम फ्रँचायझीचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. 11 वर्षांनंतर चौथ्या 'धूम 4' चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता आमिर खान किंवा हृतिक रोशन किंवा जॉन अब्राहम नाही तर वेगळ्याच अभिनेत्याची निवड झाल्याची चर्चा आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर धूम 4 चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.
'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
अभिनेता रणबीर कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर रणबीरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. आता दरम्यान, रणबीर कपूर 'धूम 4' या चित्रपटात दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.
रणबीर कपूर धूम 4 चित्रपटामध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी आता रणबीर कपूरच्या नावाची चर्चा असून याबद्दल चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :