VIDEO : 'दुनियादारी' फेम अभिनेत्याची तब्येत पाहून नेटकरी चिंतेत, ओळखही पटवणं कठीण
Sushant Shelar Viral Video : 'दुनियादारी' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Sushant Shelar Viral Video : बहुप्रतिक्षित धर्मवीर 2 चित्रपट नुकताच रिलीज झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. त्याआधी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती. या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ग्रँड प्रीमियरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एका अभिनेत्यानं सर्वांच लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याकडे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
'हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते' म्हणणाऱ्या अभिनेत्याला ओळलत का?
धर्मवीर 2 चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरमध्ये एका मराठी अभिनेत्याला पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. नेटकरी या अभिनेत्याला पाहून चिंतेत पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या क्षणी पाहता या अभिनेत्याला ओळखणंही कठीण झालं आहे. या अभिनेत्याची शरीरयष्टी पाहता हा आजारी तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मराठी अभिनेत्याने सर्वांना धक्का दिला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा आणि सर्वांना चिंतेत टाकणारा हा अभिनेता सुशांत शेलार आहे.
'दुनियादारी' फेम अभिनेत्याचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत,
दुनियादारी चित्रपटातून स्टारडम मिळवणारा अभिनेता सुशांत शेलार याने या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली. "हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते", हा त्याचा चित्रपटातील डॉयलॉगही खूप प्रसिद्ध झाला होता. आता अलिकडेच अभिनेता सुशांत शेलार याने धर्मवीर 2 चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी अनेक बडे कलाकार उपस्थित होते. पण, सर्वांच्या नजरा सुशांत शेलारकडे होत्या, याचं कारण म्हणजे सुशांतची तब्येत. व्हायरल व्हिडीओमध्ये सुशांत शेलार खूप बारीक झाल्याचं दिसत आहे. त्याची आधीची शरीरयष्टी आणि आताची शरीरयष्टी याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसत आहे. यामुळेच सुशांत शेलार आजारी आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
पाहा आणि तुम्हीच ओळखा 'या' अभिनेत्याला
View this post on Instagram
ओळखही पटवणं कठीण
अभिनेता सुशांत सिंह सध्या खूप बारीक झाला आहे. तो आजारी असल्याचं अनेकांना वाटत आहेत. त्यामुळे चाहते त्याची काळजी करताना दिसत आहेत. चाहते सध्या चिंतेत असून त्याच्या तब्येतीची विचारपूसही करत आहेत. सुशांत शेलार सध्या सिनेसृष्टीपासून दूर असून राजकारणात सक्रिय आहे. अभिनेता सुशांत शेलार शिवसेना शिंदे गटाच्या चित्रपट सेनेचा सचिव आणि अध्यक्ष आहे. यामुळेच तो धर्मवीर 2 चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला पोहोचला होता, पण त्याची तब्येत पाहता चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :