धर्मेंद्रंना करायची होती गोविंदांच्या डान्सची कॅापी, प्रोड्यूसरकडे केली होती डिमांड...
निर्माते पहलाज निहलानी यांनी सांगितलं की, धर्मेंद्रने चित्रपटात गोविंदासारखा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ऐंशी-नव्वदीच्या दशकात आपल्या कॉमेडीचं टायमिंग आणि स्टायलिश डान्सने तरुणांना वेड लावणाऱ्या गोविंदाचे आजही अनेक चाहते आहेत. सोशल मीडियातून त्याच्या चाहत्यांनी केलेले डान्स समोर आले आहेत. गोविंदाचा फॅन असलेल्या ‘डान्सिंग अंकल’ना सोशल मीडियामुळे तुफान प्रसिद्धी मिळाली होती. फक्त चाहते नाही तर बॉलीवूडमधील अनेक सुपरस्टार देखील गोविंदाच्या डान्सचे चाहते आहेत. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील गोविंदाच्या डान्सचे चाहते असून याबाबत त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. मल्टी-स्टार चित्रपट 'आग ही आग' मध्ये धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, मौसमी चटर्जी, चंकी पांडे, नीलम आणि डॅनी डेंजोंगप्पा यांच्यासारखे बडे स्टार्स होते. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झालेला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट होता.
नुकतंच या चित्रपटीतील स्टार कास्ट संदर्भात एक छोटा किस्सा समोर आलेला आहे. 'आग ही आग' चित्रपटातील बहादुर सिंह या पात्राची भूमिका दिलीप कुमार सोबत ठरली होती. पण, दिलीप कुमारांनी ती भूमिका साकारण्यास नकार दिला होता. म्हणून धर्मेंद्रने ती भूमिका निभावली. त्यांना या चित्रपटात गोविंदासारखा डान्स करायचा होता.
'इल्जाम' आणि 'आग ही आग' या दोन्ही चित्रपटांचे निर्माते पहलाज निहलानी हे एक किस्सा शेयर करत म्हणाले की, "ते आपले घनिष्ट मित्र शत्रुघ्न सिन्हा सोबत वेळ घालवण्यासाठी रामगढला गेले होते. तेव्हा तिथे धर्मेंद्र आपला चित्रपट 'लोहा' याचे शूटिंग करत होते." त्या दरम्यान पहलाज हे 'लोहा' चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. तेव्हा तिथे त्यांची ओळख धर्मेंद्रसोबत झाली. याच सेटवर दोघांची ही पहिली भेट झाली. धर्मेंद्रने जेव्हा हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला होता तेव्हा त्यांनी हा चित्रपट करण्यासाठी मागणी केली होती.
View this post on Instagram
धर्मेंद्रने निर्मात्यांना सांगितलं की माझ्याकडून पण गोविंदासारखा डान्स करुन घ्या. त्यानंतर धर्मेद्र लोकांसमोर गोविंदासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लोकं ते बघून खूप एक्सायटेड झाले होते.