Dharmendra Passes Away: धर्मेंद्रंच्या शेवटच्या चित्रपटातील व्हॉईस नोट व्हायरल झाली अन् काहीवेळातच घराबाहेर अॅम्बुलन्स पाठोपाठ निधनाची बातमी, नेमकं काय घडलं?
Dharmendra Passes Away: सुपरस्टारला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांच्यावर त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी अंत्यसंस्कार केले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.

Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He Man) धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन झालंय. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या राहत्या घरी आली, त्याचवेळी धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच अर्ध्या तासांतच रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर आली, त्यावेळी सर्वांना धक्काच बसला. रुग्णवाहिकेत धर्मेंद्र यांचं पार्थिव होतं, जे विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुपरस्टारला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांच्यावर त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी अंत्यसंस्कार केले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. अशातच अनेक दिग्गज धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचलेले.
प्रकृती अस्वास्थामुळे राहत्या घरीच सुरू होते उपचार
12 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबीयांच्या विनंतीवरून ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहूतील राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचीही माहिती मिळत होती. अखेर आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि देशभरातील त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शेवटच्या सिनेमाचं मोशन पोस्टरा आणि वॉईस नोट रिलीज
सोमवारीच, 'इक्कीस'मधील धर्मेंद्र यांच्या व्यक्तिरेखेचं नवं मोशन पोस्टर रिलीज झालं. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांची एक व्हॉईस नोट देखील आहे. त्यांचा आवाज ऐकून चाहते भावूक झालेत. एकीकडे चित्रपटाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांच्या निधनाच्या वृत्तानं चाहत्यांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
मोशन पोस्टरमध्ये धर्मेंद्र यांचा आवाज ऐकू येतोय. यामध्ये धर्मेंद्र म्हणत आहेत की, "मेरा बड़ा बेटा अरुण, ये हमेशा इक्कीस का ही रहेगा..." या फिल्ममध्ये धर्मेंद्र सेकेंड लेफ्टिनंट अरुण खेत्रपाल (अगस्त्य नंदा )च्या वडिलांच्या भूमिकेत दिसलेत. मॅडॉक फिल्मच्या या नव्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "वडील मुलांचं संगोपन करतात. महापुरुष राष्ट्र घडवतात... धर्मेंद्रजी एका 21 वर्षीय अमर सैनिकाचे वडील म्हणून इमोशनल पावरहाऊस आहेत."























