Dharmendra Health Update: 'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली
Dharmendra Health Update: आपला लाडका सुपरस्टार कसा आहे? रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय, पण सध्या प्रकृती कशी आहे? याबाबत जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण अधीर झालाय.

Dharmendra Health Update: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या खालावली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अकरा दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला असून सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यानंतर, सुपरस्टार अमिताभ बच्चन ते निर्माता-दिग्दर्शक गुड्डू धनोआपर्यंत कित्येक सेलिब्रिटी आणि सिनेक्षेत्रातील सुप्रसिद्ध निर्मात्यांनी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रांग लावली. त्यांना भेटून परतणारा प्रत्येकजण चिंतेत दिसत होता. त्यामुळे चाहत्यांच्याही जीवाची घालमेल सुरू आहे. आपला लाडका सुपरस्टार कसा आहे? रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय, पण सध्या प्रकृती कशी आहे? याबाबत जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण अधीर झालाय... अशातच धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 'ही-मॅन'च्या आरोग्याबाबत अपडेट शेअर केली आहे.
"आता सर्वकाही देवाच्याच हातात..." (Hema Malini On Dharmendra Health)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुभाष के. झा (Subhash K Jha) यांच्याशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "हा माझ्यासाठी सोपा काळ नव्हता... धरमजींची तब्येत आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यांची मुलं रात्री झोपू शकत नाहीत... सध्या मी अजिबात खचून जाऊ शकत नाही, खूप जबाबदाऱ्या आहेत, पण हो... ते घरी परतल्याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले आणि घरी परत आले, याचा आम्हाला दिलासा आहे. त्यांना त्यांच्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा."
धर्मेंद्र यांच्यावर पुढचे उपचार घरीच
तब्बल अकरा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुपरस्टार धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी सांगितलं की, "धर्मेंद्रजींना बुधवारी सकाळी 7:30 वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच सुरू राहतील." डॉक्टरांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांच्यावर पुढचे उपचार घरी करण्याचा निर्णय देओल कुटुंबीयांनी घेतला आहे.
अभिनेत्याच्या टीमनं केलेलं निवेदन जारी
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर अभिनेता सनी देओलच्या टीमनं एक अधिकृत निवेदन जारी केलेलं. टीमनं सांगितलेलं की, धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि आता यापुढचे उपचार त्यांच्यावर घरीत केले जातील. आम्ही मीडिया आणि जनतेला विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























