Dharmendra Prakash Kaur Love Story: धर्मेंद्र यांची पहिली पत्नी, हेमा मालिनींची सवत, कोण आहेत प्रकाश कौर? अशी होती सनी, बॉबीच्या आई-वडिलांची 70 वर्षांपूर्वीची जुनी लव्ह स्टोरी
Dharmendra First Wife Prakash Kaur Love Story: 1954 मध्ये धर्मेंद्र सिंह देओल या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पंजाबी मुलानं प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं.

Dharmendra Love Story With First Wife Prakash Kaur: बॉलिवूडचा (Bollywood News) 'ही-मॅन' धर्मेंद्र (Dharmendra) आजही त्यांचा अभिनय, साधेपणा आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. धर्मेंद्र यांचे अनेक किस्से, त्यांची प्रेमप्रकरणं आपल्याला माहीत आहेत. पण, त्यांच्या आयुष्यातला एक अध्याय असा आहे, जो ग्लॅमरपासून खूप दूर आहे, तो म्हणजे, त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur). धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आणि सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol) यांची आई प्रकाश कौर नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. पण, असं असलं तरीदेखील देओल कुटुंब आज जे खंबीरपणे उभं आहे, त्याचा आधारस्तंभ या प्रकाश कौर याच आहेत. लाईमलाईटपासून दूर राहून त्या आपल्या कुटुंबासाठी अगदी ठामपणे उभ्या राहिल्या.
1954 मध्ये धर्मेंद्र सिंह देओल या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पंजाबी मुलानं प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं. तेव्हा ना धरम पाजी बॉलिवूडमध्ये होते आणि ना त्यांना स्टारडम मिळालेलं. पुढे धर्मेंद्र यांनी पडद्यावरचं ग्लॅमर निवडलं, पण त्यांची सहचारणी म्हणून त्यांच्या संसार सांभाळणाऱ्या प्रकाश कौर मात्र कायम ग्लॅमरपासून नेहमीच दूर राहिल्या. त्यांनी संसाराची धुरा सांभाळली. चार मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या आयुष्यात, त्या फक्त एकाच मुलाखतीत दिसलेल्या. ती मुलाखत प्रकाश कौर यांची पहिली आणि शेवटची ठरली. आज त्यांची दोन्ही मुलं स्टार आहेत आणि त्यांचा आयु्ष्यभराचा जोडीदार एकेकाळातील इंडस्ट्रीच्या सर्वात देखण्या नायकांपैकी एक होता. आजही धर्मेंद्र याचं स्टारडम काही कमी झालेलं नाही, आजही ते अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
70 वर्षांपूर्वीची लव्ह स्टोरी (Dharmendra Prakash Kaur Love Story)
त्यावेळी धर्मेंद्र फक्त आणि फक्त 19 वर्षांचे होते. पंजाबच्या फगवाडामधील एका जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या धर्मेंद सिंह देओल यांनी फिल्मफेयर टँलेंट हंट जिंकलेला. पण, त्यापूर्वीच त्यांचं लग्न झालेलं. 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी धर्मेंद्र यांचं अरेंज मॅरेज झालेलं. प्रकाश कौर त्या काळातील 'ग्रेसफुल पंजाबन' होत्या. सोज्वळ आणि धैर्य त्यांची ओळख होती. धर्मेंद्र यांनी स्वतः सांगितलेलं, "मी फिल्ममध्ये येण्यापूर्वीच लग्न केलेलं... प्रकाश माझ्या आयुष्यातली पहिली आणि खरी हिरोईन आहे..."
धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं झाली. त्यापैकी दोघे म्हणजे, बॉलिवूड स्टार्स सनी देओल, बॉबी देओल आणि दोन मुली अजीता आणि विजेता. सनी देओल, बॉबी देओल यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीची वाट धरली. तर, त्यांच्या मुलींनी ग्लॅमरपासून दूर प्रायव्हेट लाईफ निवडली. त्यांची एक मुलगी सायकोलॉजिस्ट आहे, तर दुसरी मुलही डायरेक्टर आहे.
दुसऱ्या लग्नानंतरही प्रकाश कौर यांच्यासोबतचं नातं कायम (Dharmendra Second Marriage)
1980 मध्ये ज्यावेळी धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं, त्यावेळी संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली. त्यावेळी अशीही चर्चा रंगलेली की, धर्मेंद्र यांनी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला आहे. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा नव्हता. दरम्यान, या सर्वात प्रकाश कौर यांनी सार्वजनिकरित्या कधीच कोणतीच नकारात्मक कमेंट केलेली नाही. 'स्टारडस्ट'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना प्रकाश कौर म्हणालेल्या की, "धर्मेंद्र परफेक्ट पती नाहीत, पण ते उत्तम पिता आहेत... हेमाजी खूपच सुंदर आहेत, कोणताही पुरूष त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो..."
साधेपणानं जगतायत आयुष्य... (Who IsPrakash Kaur?)
पती सुपरस्टार असूनही प्रकाश गौर नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिल्या. त्यांनी आपली मुलं आणि नातवंडांमध्ये वेळ घालवला. पण, कधी कॅमेऱ्यासोर आल्या नाहीत. सनी देओलचे त्याच्या आई आणि बहिणींसोबतचे फोटो ऑनलाइन शेअर करत असतो, जे कुटुंबातील अटूत नात्याचं आणि प्रेमाचा पुरावा वारंवार देतात. सनी आणि बॉबीच्या यशस्वी कारकिर्दीपासून ते करण देओलच्या तिसऱ्या पिढीपर्यंत, देओल कुटुंब बॉलिवूडमध्ये चमकत आहे आणि या संपूर्ण कथेचा खरा पाया म्हणजे प्रकाश कौर.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























