Dhanashree Verma: घटस्फोटानंतर पूर्णपणे बदललंय धनश्रीचं आयुष्य; म्हणाली, 'माझ्याबद्दलचे तर्क-वितर्क...'
Dhanashree Verma Yuzvendra Chahal: धनश्री वर्मानं चहलसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच तिच्या आयुष्याबद्दल आणि ट्रोलिंगबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.

Dhanashree Verma Yuzvendra Chahal: कोरियोग्राफर, अभिनेत्री (Actress) आणि युट्यूबर धनश्री वर्मा (YouTuber Dhanashree Verma) अलीकडेच क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या (Yuzvendra Chahal) घटस्फोटामुळे चर्चेत होती. या काळात तिला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. आता धनश्रीनं चहलसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच तिच्या आयुष्याबद्दल आणि ट्रोलिंगबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.
नेहमीच कष्टाळू राहिलेय : धनश्री वर्मा
धनश्री वर्मानं (Dhanashree Verma) नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिलीय. मुलाखतीत बोलताना धनश्रीनं तिच्या आयुष्यांत झालेल्या बदलांबद्दल सांगितलं आणि घटस्फोटानंतर ती पूर्णपणे बदलली असल्याचंही सांगितलं. तसेच, घटस्फोटाआधी आणि नंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्याबाबत बोलताना ट्रोलिंगचा मला काहीच फरक पडत नाही, कारण तिनं स्वतःला मजबूत बनवलं आहे, असंही ती म्हणाली.
धनश्री वर्मा बोलताना म्हणाली की, "ट्रोलिंगचा मला अजिबात त्रास होत नाही, कारण मी स्वतःला मजबूत केलं आहे. मी स्वतःला इतकं सुरक्षित ठेवलंय की, बाहेरचा गोंधळ मला अजिबातच त्रास देत नाही. मी नेहमीच एक मेहनती व्यक्ती राहिले आहे. आता मी माझी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे आणि आंतरिक शक्ती, शिस्त, व्यायाम आणि हेल्दी खाणं यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मी स्वतःला अशा लोकांभोवती वेढलंय, जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझा आदर करतात."
मी इतरांनाही सक्षम, मजबूत होण्यासाठी प्रेरित केलंय : धनश्री वर्मा
तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना धनश्री म्हणाली की, "या कठीण काळात मी माझ्या भावनांना माझ्या कौशल्यात म्हणजेच, नृत्यात साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, मी अधिक लोकांना शक्तीला त्यांचे सक्षम बनवण्यासाठी प्रेरित केलंय. मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, स्वावलंबनाचं महत्त्व आणि माझ्या पालकांनी एका सक्षम मुलीला वाढवलं आहे. काहीतरी नवीन शिकण्याचा आणि स्वतःला सक्षम बनवण्याचा हा काळ आहे. मला माझ्याबद्दलचे कोणतेही गैरसमज स्पष्ट करण्यात मला आता रस नाही. कारण त्यामुळे फक्त आणि फक्त अधिक तर्क-वितर्क काढले जातात. हे तर्क-वितर्क माझ्या कामाबद्दलचे असावेत असं मला वाटतं. सध्या मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे."
2020 मध्ये युजवेंद्र चहलसोबत केलेलं लग्न
धनश्री वर्मानं 2020 मध्ये भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्न केलेलं. दरम्यान, लग्नाच्या काही वर्षांनी दोघांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर याच वर्षी दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांचाही घटस्फोट झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























