एक्स्प्लोर

धनश्री-युझवेंद्र यांच्यात चाललंय काय? दोघांमध्ये आरजे माहवश येताच घेतला मोठा निर्णय, तिने इन्स्टाग्रामवरचे सर्व फोटो पुन्हा...

युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश यांचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर धनश्री वर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुक्त्यात झालेल्या भारत-न्युझीलंड यांच्या सामन्यात युझवेंद्र चहलसोबत आरजे माहवश (RJ Mahvash) दिसल्यामुळे आता युझवेंद्र-धनश्री ही जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात असून त्यांच्या घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश एकत्र दिसल्यानंतर आता धनश्री वर्माने मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयानंतर आता नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

धनश्री वर्माने नेमकं काय केलंय?

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल लवकरच घटस्फोट घेणार असल्याचा दावा केला जातोय. त्यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्यांचही म्हटलं जातंय. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून हे दोघे एकत्र दिसलेले नाहीत. दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्यानंतर धनश्री वर्माने युझवेंद्रसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले होते. त्यानंतर आता युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे लाईव्ह सामन्यात एकत्र बसलेले कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर आता धनश्रीने इन्स्टाग्रामवरील युझवेंद्रसोबतचे सर्व फोटो अनआर्काईव्ह केले आहेत. त्यामुळे आता धनश्रीच्या इन्स्टाग्राम खात्यावर युझवेंद्र चहलसोबतचे सर्व फोटो दिसत आहेत. काही फोटोंमध्ये हे दोघे एकमेकांसोबत उभे राहिल्याचे दिसत आहे. तर काही फोटोंच्या कॅप्शनमध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलचे तोंडभरून कौतुक केलेले दिसत आहे. आता धनश्रीने दोघांचे सर्व फोटो अनआर्काईव्ह केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. तिने असा निर्णय का घेतला? असे विचारले जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Mahvash (@rj.mahvash)

 युझवेंद्र-आरजे माहवश दिसले एकत्र 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत विरुद्ध न्युझीलंड या अंतिम सामन्यात युझवेंद्र आणि आरजे माहवश एकत्र दिसले. युझवेंद्र यावेळी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र तो स्टेडियममध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत होता. याच सामन्यात त्याच्या बाजूला आरजे माहवश बसलेली होती. विशेष म्हणजे हे दोघेही एकत्र बसून थट्टा-मस्करी करताना दिसत होते. त्याचे हसणे कॅमेऱ्यात कैद झाले होते. हे दोघेही एकत्र दिसल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आरजे माहवश ही एक  रेडिओ जॉकी आहे. ती अभिनेत्री, निर्मातीही आहे. तिचे इन्स्टाग्रावर लाखो चाहते आहेत.

धनश्री-युझवेंद्र यांच्यात चाललंय काय? दोघांमध्ये आरजे माहवश येताच घेतला मोठा निर्णय, तिने इन्स्टाग्रामवरचे सर्व फोटो पुन्हा...

धनश्रीच्या इन्स्टा स्टोरीची चर्चा

युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे एकत्र दिसल्यानंतर धनश्री वर्मा चर्चेत आली. या दोघांचे फोटो समोर आल्यानंत अवघ्या काही तासांनंतर धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली. या सूचक स्टोरीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 'स्त्रियांना दोषी ठरवणे ही एक फॅशन राहिलेली आहे' असं तिने या स्टोरीमध्ये म्हटलं होतं. 

View this post on Instagram
 
A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

दरम्यान, आता धनश्रीने युझवेंद्रसोबतचे फोटो अनआर्काईव्ह केल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

चित्रपटांत दिसत नाही, जाहिरातीही नाही, तरी पूनम पांडेकडे थक्क करणारी संपत्ती, करोडो रुपये कमवले तरी कसे?

युझवेंद्र चहलसोबत सुंदर आरजे माहवश दिसली, इकडे धनश्री वर्माच्या सूचक इन्स्टा स्टोरीनेही वादळ उठवलं; म्हणाली, नेहमी स्त्रियाच...

इकडे युझवेंद्र चहलसोबत आरजे माहवश झळकली, तिकडे धनश्री वर्मा पुन्हा चर्चेत; दोघींपैकी श्रीमंत कोण? कोणाकडे किती संपत्ती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget