एक्स्प्लोर

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: 'तळतळाट द्यायला भाग पाडू नका...'; डीपीदादानं सरकारकडे कोल्हापूरकरांच्या लाडक्या 'महादेवी'ला परत मागितलं

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: बिग बॉस मराठी फेम सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय.

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनताराकडे (Vantara) रवाना करण्यात आली. हत्तीणीला निरोप देताना ग्रामस्थ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच लाडक्या महादेवीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली. महादेवीच्या निरोपावेळी गावात भावूक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू होते. एवढंच काय, इतकी वर्ष ग्रामस्थांसोबत त्यांच्याच कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिलेल्या महादेवीच्या डोळ्यांतही अश्रू पाहायला मिळाले. मात्र, या निर्णयामुळे अवघ्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या मनात भावनिक असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू केली आहे. तसेच, याचा संताप अनेकजण जियोवर बहिष्कार घालून करत आहेत. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर बिग बॉस मराठी फेम सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार (Bigg Boss Marathi Fame Social Media influencer Dhananjay Powar) उर्फ डीपीदादानं एक इमोनल व्हिडीओ शेअर केलाय. 

बिग बॉस मराठी फेम सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारनं (Dhananjay Powar) आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्याला "लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याची थोडीशी जाणीव ठेवा आणि आमची महादेवी आम्हाला परत द्या", असं कॅप्शन दिलं आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

व्हिडीओमध्ये डीपीदादानं काय म्हटलंय?

सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार म्हणाला की, "न्यायालयाच्या निकालानंतर आमच्या महादेवी हत्तीणीला वनविभागामध्ये नेल्यानंतर जो गदारोळ इथे सुरू आहे. त्यावर मला काही बोलायचं आहे की, आपण ज्या सरकारला निवडून दिलं आहे, ते सरकार, वनविभाग आणि त्या कुटुंबाला हे लक्षात यायला हवं की, जो विरोध केला जात आहे. तो आर्थिक गोष्टींसाठी नाही, हा भावनिक विषय आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जिला आम्ही महादेवीचा दर्जा दिला, तिच्याकडे आम्ही आदराने, श्रद्धेने आणि अंंत:करणातून आलेल्या प्रेमाने पाहतो, तिला तुम्ही आता वनविभागात घेऊन गेला आहात".

"माणसांमध्ये वाढलेली आहे ती, माणसांच्या प्रेमाची भुकेली आहे. तिच्या छत्रछायेखाली तिच्या आशीर्वादाने, तिच्या आनंदात तिच्या दु:खात कितीतरी लोक लहानाचे मोठे झाले. गेली कित्येक वर्ष... आज सांगली, कोल्हापुर आणि कर्नाटका सीमा भागातील अनेक लोकांची तिच्याभोवती वर्दळ होती. हे फक्त आणि फक्त तिच्या प्रेमापोटी. लाखों लोकांचा जनसमुदाय तुमच्या समोर, तुमच्या विरोधात उभा राहिला. कारण म्हणजे प्रेम भावना आणि तिची असलेली काळजी. या लाखो लोकांचा विचार करा. त्यांच्या भावनेचा विचार करा. ती हत्तीण त्यांना परत द्या", असं डीपीदादा व्हिडीओमध्ये म्हणाला. 

पुढे बोलताना डीपीदादा म्हणाला की, "खूप लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मला हजारो लोकांनी मेसेज केले आहेत की, यावर काहीतरी पर्याय असायला हवा. यासाठी तुम्ही बोला. लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मला अनेकांनी सांगितलं. पण मी लोकांना व्यक्त होण्यासाठी किंवा प्रवृत्त करण्यापेक्षा हे म्हणेन की, तुम्ही जिला घेऊन गेला आहात, त्याचं कारण काहीही असो. पण हजारो लोकांच्या भावनांचा विचार करून तुम्ही तिला परत द्या. मला एवढंच सांगायचं की त्या लाखो लोकांचा आशिर्वाद घ्या, त्यांना तळतळाट देण्यावर भाग पाडू नका..."

नेमकं घडलं काय? 

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेच ठिकाण मानलं जातो. या मठामध्ये मागील तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीण आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं. त्यामुळं मठाकडून या हत्तीणीचा सांभाळ करण्यात आलाय. मात्र, 2021 मध्ये गुजरातमधल्या वनतारा या खाजगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठाशी संपर्क साधण्यात आला आणि हत्तीणीची मागणी करण्यात आली. त्या बदल्यात मठाला देणगीस्वरुपात मदत करण्याचं आश्वासन देखील दाखवण्यात आलं. मात्र महादेवी हत्तिणी सोबत धार्मिक भावना जोडल्या असल्यानं मठानं हत्तीण देण्यास नकार दिला. त्यानंतर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट फॉर द एनिमल अर्थात पेटा या संस्थकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाकडून हत्तीची परिस्थिती नक्की कशी आहे हे पडताळण्यासाठी हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल पाहिले आणि हाय पॉवर कमिटीने दिलेला अहवाल ग्राह्य धरत महादेवी हत्तीणीला वनतारा इथल्या खाजगी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sneha Wagh Decline To Work In Marathi Serial: 'टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा मराठी इंडस्ट्रीतच काम करायला नकार, कारण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget