एक्स्प्लोर

Deool Band 2: प्रविण तरडेंनी लिहिलेला 'तो ' डायलॉग घेण्यास मोहन जोशींनी दिलेला स्पष्ट नकार; देऊळ बंद 2 च्या वेळेस स्वतःच म्हणाले ..

या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते व दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते मोहन जोशी 'माझा कट्टा ' वर आले होते. या चित्रपटाच्या संदर्भातील अनेक गोष्टींविषयी मनमोकळेपणाने त्यांनी गप्पा मारल्या. 

Deool Band 2 Mohan Joshi Pravin Tarde: प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित 'देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची ' (Deeol Band 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पहिल्या भागात राघव शास्त्रीच्या आलिशान चारचाकीत प्रवास करणारे स्वामी आता एका शेतकरी महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 21 मे 2026 ला प्रदर्शित होणार आहे. 'देऊळ बंद'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थांची भूमिका पडद्यावर जिवंत केली होती.  2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद चित्रपटानंतर तब्बल 11 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या 10  वर्षाच्या काळात अभिनेते मोहन जोशी यांच्या तब्येतीत अनेक चढउतार आले. अर्धांगवायूच्या (पॅरेलिसिस ) त्रासावर मात करून देऊळ बंद 2 मध्ये शेतकरी महिलेच्या दुचाकी वर प्रसन्न मुद्रेत हात उंचावर ते मागे बसलेले दिसतात. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते व दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते मोहन जोशी 'माझा कट्टा ' वर आले होते. या चित्रपटाच्या संदर्भातील अनेक गोष्टींविषयी मनमोकळेपणाने त्यांनी गप्पा मारल्या. 

मोहन जोशींनी दिलेला तो डायलॉग म्हणण्यास स्पष्ट नकार

'देऊळ बंद ' चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद चित्रपटावेळी घडलेला एक किस्सा सांगितला. ते स्वतः निर्व्यसनी असल्यामुळे देऊळ बंद चित्रपटात त्यांनी आवडीने डायलॉग लिहिला. पण हा डायलॉग घेण्यास मोहन जोशी काही केल्या तयारच होईनात. 

प्रवीण तरडे म्हणाले 'मी स्वतः निर्व्यसनी आहे. माझ्या प्रत्येक सिनेमात दारू किंवा सिगारेट दिसणार नाही. देऊळ बंद चित्रपटात मी आवडीने डायलॉग लिहिला स्वामींचा -' दारू पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'..मला वाटलं या डायलॉगचा लोकांवर जाम परिणाम होईल. मो.जो म्हणाले ' हट ss मी हा डायलॉगच बोलणार नाही ' मी त्यांना समजावत होतो ' स्वामींनी जर सांगितलं तर समाजातलं व्यसन कमी होईल. ते म्हणाले 'माझं व्यसन कोण कमी करणार ' उद्या जर मी कुठे काही करताना दिसलो तर लोक माझ्या नावाने ओरडतील. ' ते म्हणाले ' मी जर दारू पीत नसतो तर मी हा डायलॉग घेतला असता. त्यामुळे मी हा डायलॉग घेणार नाही. हा डायलॉग बदल. नंतर 10 वर्षांनी तेच मोहन जोशी मला येऊन म्हणतात ' यावेळी तो दारूचा डायलॉग टाका ना ... '. मी म्हणालो 'आता का ? ' त्यावर मोजो म्हणाले ' आता मी काहीच करत नाही ' आता मी सगळं सोडलं आहे. मला बरं वाटलं ' जे मोहन जोशी माझ्यावरती ओरडले होते की 'हा डायलॉग बोलणार नाही.' त्यांनी त्यावेळी इतर डायलॉग म्हटले - 'सिग्नल मोडू नको मी तुझ्या पाठीशी आहे ' कारण ते म्हणाले की मी स्वतः सिग्नल मोडत नाही. त्यामुळे मी हा डायलॉग म्हणेन. पण मी दारू विषयी लोकांना ज्ञान सांगणार नाही ' असं म्हणत त्यांनी तो संवाद नाहीच घेतला. ' असं प्रवीण तरडेंनी सांगितलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget