एक्स्प्लोर

Deool Band 2 First Poster Released: 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामींचा सर्वसामान्य महिलेच्या दुचाकीवरुन प्रवास; 'देऊळ बंद 2'च्या पहिल्या पोस्टरनं उत्सुकता वाढवली

Deool Band 2 First Poster Released: 'देऊळ बंद 2' सिनेमात मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे झळकणार आहे.

Deool Band 2 First Poster Released: बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा (Marathi Film) 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) च्या प्रदर्शनाची 21 मे 2026 ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज 'देऊळ बंद 2'चं पहिलं पोस्टर (Deool Band 2 First Poster Released) प्रदर्शित झालं आणि आनंदात अजूनच भर पडली. 'देऊळ बंद' (Deool Band) मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Actor Mohan Joshi) यांनी आपल्या सशक्त अभिनयानं आणि आवाजानं स्वामी समर्थ (Swami Samartha) अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभं राहून आपल्याशी संवाद साधत आहेत, असं प्रेक्षकांना वाटत होतं. तेच सर्वांना 'देऊळ बंद 2'मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे (Actress Snehal Tarde) त्यांच्या सोबत असणार आहेत.

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद 2 - आता परीक्षा देवाची'च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेनं हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. "भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात...", हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होतोय.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला होता तर 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात स्वामीकृपेनं एका सामान्य कुटुंबाची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार असं दिसतंय.

21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित 'देऊळ बंद 2' ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Namdeo Dhasal Biopic: पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखवणाऱ्या 'पँथर'चा झंझावत मोठ्या पडद्यावर; 'हा' मराठी अभिनेता नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Filmfare Marathi 2026‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget