एक्स्प्लोर

Deool Band 2: 'देऊळ बंद 2' चं बजेट 12 लाखांवरून 42 लाखांवर गेलं अन् पैसेच संपले; बॉलिवूडचा किंग खान आला मदतीला धावून; प्रविण तरडे म्हणाले ..

देऊळ बंद 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करतोय.या चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत

Pravin Tarde on Shahrukh Khan Help for Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band2l 2) चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा टप्पा ओलांडत धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची एकच चर्चा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Pravin Tarde) अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. अलीकडेच केलेल्या एका मुलाखतीत तर त्यांनी देऊळ बंद 2 चित्रपटाला बॉलीवूडच्या किंग खानने म्हणजेच शाहरुख खानने ( Shahrukh Khan) मदत केल्याचं सांगितलं. 

काय म्हणाले प्रवीण तरडे ?

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचा डिजिटल फॉरमॅट करण्यासाठी पैसे संपल्याचं सांगितलं. बारा लाखांचं बजेट 42 लाखांपर्यंत पोहोचलं. एवढे पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न पडल्यानंतर आम्ही शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली. ही बातमी थेट शाहरुखपर्यंत गेली. आणि नंतर रेड चिलीज ने 40 ते 45 टक्के बिल माफ केलं. असं 'अभिजात मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सांगितलं.

ते म्हणाले 'पुण्यामध्ये हेमंत गुजराती यांचा डॉन नावाचा स्टुडिओ आहे.या चित्रपटाच्या यशासाठी त्यांचेही आभार मानले पाहिजेत.सिनेमाचं बजेट संपलं होतं.सिनेमाचा डीसीपी म्हणजेच थेटर मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी केला जाणारा डिजिटल फॉरमॅट काढण्यासाठी पैसेच नव्हते.सिनेमाचं बजेट 12 लाखांचं होतं.पण ते 42 लाखांपर्यंत पोहोचलं. एवढे पैसे कुठून आणणार ?त्यामुळे आम्ही शाहरुख खान यांच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली.ही बातमी शाहरुख खानपर्यंत गेली.त्यांनी तंत्रज्ञानांना सिनेमाबद्दल विचारलं.मुळशी पॅटर्न वाल्याचा सिनेमा आहे म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. कारण सलमानने 'अंतिम' सिनेमा केला होता.पैसाला शिवाय डीसीपी काढत नाहीत हा नियम आहे.पण शाहरुखने बिन माफ करायला सांगितलं. सिनेमा चांगला आहे म्हटल्यावर त्यांनी मदत केली.जवळपास 40 ते 45% बिल रेड चिलीजने माफ केलं. सिनेमा चांगला बनवलाय, पैशांचं आपण नंतर बघू, असं त्यांनी सांगितलं. शाहरुख सरांना जे वाटलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना! ' असं प्रवीण तर त्यांनी सांगितलं.

दरम्यान, देऊळ बंद 2 चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करतोय.या चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.रमेश परदेशीही सविता मालपेकर, मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनी हे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे घोषणा केली आहे.त्यामुळे हा चित्रपट आणखी किती कोटींचा टप्पा गाठतो? हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार? आणि या चित्रपटाचा पुढचा भाग नेमका कधी पहायला मिळणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget