Upcoming Web Series : स्कॅम 2003 ते दिल्ली क्राईम 2; या आगामी वेब सीरिज करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Upcoming Web Series : या आगामी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत
![Upcoming Web Series : स्कॅम 2003 ते दिल्ली क्राईम 2; या आगामी वेब सीरिज करणार प्रेक्षकांचे मनोरंजन delhi crime season 2 asur 2 Scam 2003 web series returning with a new season Upcoming Web Series : स्कॅम 2003 ते दिल्ली क्राईम 2; या आगामी वेब सीरिज करणार प्रेक्षकांचे मनोरंजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/b1652979e624df4c5af0f5a4fb5a078b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OTT Releases : ओटीटीवरील वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज लोक आवडीने पाहतात. काही आगामी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोण कोणत्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत ते पाहूयात...
दिल्ली क्राईम 2 (Delhi Crime 2)
दिल्ली क्राईम या सीरिजच्या पहिला सिझनचे कथानक हे निर्भया केसवर आधारित होते. सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजचा लवकरच दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार, दुसऱ्या सिझनचे कथानक हे निठारी सीरियल मर्डर केसवर आधारित असणार आहे.
असुर सिझन 2 (Asur-2)
अभिनेता अरशद वारसीची प्रमुख भूमिका असलेल्या असुर या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. असुर सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये बरुण सोबती, रिद्धि डोगरा आणि अनुप्रिया गोयंका या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
स्कॅम 2003 (Scam 2003)
हंसल मेहता यांच्या स्कॅम 1992 या वेब सीरिजनं अनेक रेकॉर्ड्स तोडले. या सीरिजमधील अभिनेता प्रतिक गांधीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या सिझनचे कथानक अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
फोर मोर शॉट्स प्लिज सिझन 3 (Four More Shots 3)
फोर मोर शॉट्स प्लिज या सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझननं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कीर्ति कुल्हारी, बानी जे, मानवी गगरु आणि सयानी गुप्ता या अभिनेत्रींनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Kapil Sharma I Am not Done Yet : कॉमेडी किंग कपिल शर्माला आले होते डिप्रेशन; सांगितला अनुभव
Rakhi Sawant : बिचुकलेनं सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली; म्हणाली, 'त्याने समाधी घेतली'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)