'माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष करशील तर...'बादशाहनंतर प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी, ऑडीओ क्लिप व्हायरल
यापूर्वीही या गायकाला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. तो सध्या कॅनडातील व्हॅन्कुव्हर शहरातील व्हाईट रॉक भागात राहतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती

Death Threat To Singer: काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध पंजाबी गायकला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय. गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल यांना पुन्हा एकदा ही धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सध्या एक कथित ऑडिओ कॉल वेगाने व्हायरल होत असून त्यात स्वतःला गँगस्टर गोल्डी बराड असल्याचे सांगणारा व्यक्ती गिप्पी ग्रेवाल यांना थेट धमकी देताना ऐकू येतो. या घटनेनंतर चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मेसेजकडे दुर्लक्ष करशील तर...
व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कॉल करणारा व्यक्ती म्हणतो, “गिप्पी, मी गोल्डी बराड बोलतोय. मी तुला आधीही मेसेज केला होता, पण तुझ्याकडून अजून उत्तर आले नाही. मी भानेलाही मेसेज केला होता. मला तुमच्याशी बोलायचे आहे. माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर परिस्थिती वाईट होईल. मेसेजकडे दुर्लक्ष करू शकशील, पण येणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावाकडे कसे दुर्लक्ष करशील?” अशी थेट धमकी या ऑडिओमध्ये दिल्याचे सांगितले जात आहे.
या कॉलमध्ये मोहालीचा उल्लेख करत इशाऱ्यांमध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी अद्याप पंजाब पोलिसांनी केलेली नाही. तसेच या प्रकरणात अद्याप पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Disturbed to learn that our superstar Gippy Grewal received a threat from notorious gangster Goldy Brar — right after CM @BhagwantMann withdrew his security cover, just because he came to meet me at my Badal residence recently!
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) March 17, 2026
No one is safe in Punjab anymore, as law and order… pic.twitter.com/SyZQoUXmG9
दरम्यान, गिप्पी ग्रेवालला यापूर्वीही या गायकाला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. तो सध्या कॅनडातील व्हॅन्कुव्हर शहरातील व्हाईट रॉक भागात राहतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, त्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा गिप्पी ग्रेवाल याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















