Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटबाबत माहिती होतं? क्राईम ब्रांचच्या प्रश्नाला शिल्पानं दिलं 'हे' उत्तर
Pornography Case : काल शिल्पा आणि राज कुंद्राच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी क्राईम ब्रांचनं शिल्पाची चौकशी केली. तसेच काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या.
Pornography Case : पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर पब्लिश केल्या ठपका ठेवत अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी कोर्टानं राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलीस राज कुंद्राला त्याच्या राहत्या घरी घेऊन गेले. तिथे अभिनेत्री शिल्पा शेट्टीही उपस्थित होती. यावेळी शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रश्नांची उत्तरं शिल्पानं नाही अशीच दिली. या चौकशी दरम्यान, क्राईन ब्रांचनं शिल्पाला विचारलेल्या प्रश्नांची यादी समोर आली आहे.
क्राईम ब्रामचनं शिल्पा शेट्टीला विचारलेले प्रश्न :
1. वियान कंपनीमधून 2020 मध्ये बाहेर का पडलात? तुमचे तर चांगले शेअर्स होते?
2. तुम्हाला वियान आणि कॅमरिन या दोन्ही कंपन्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती?
3. पॉर्न व्हिडीओ लंडनमध्ये पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी अनेकदा वियान कंपनीच्या कार्यालयाचा वापर करण्यात आला आहे, याची तुम्हाला माहिती होती?
4. तुम्हाला हॉटशॉटबाबत माहीत होतं, कोण चालवायचं ते?
5. हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेंटबाबत तुम्हाला काय माहिती आहे?
6. तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभागी झाला आहात?
7. कधी प्रदीप बक्शी (राज कुंद्राचा मेव्हणा) यांच्याशी हॉटशॉटबाबत बोलणं झालं होतं?
8. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमधील चॅट आणि मेसेज दाखवून शिल्पाकडे चौकशी केली.
9. तुम्हाला राज कुंद्रा करत असलेल्या सर्व कामांबाबत माहिती होती?
10. राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहारांबाबत तुम्हाला काय माहिती आहे?
दरम्यान, शिल्पा आणि राजच्या घराची झडतीही घेण्यात आली. यावेळी क्राईम ब्रांचनं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. त्यानंतर प्रॉपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला 20 ते 25 प्रश्न विचारले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचला चौकशी दरम्यान, माहिती मिळाली होती की, शिल्पा शेट्टीला हॉटशॉटबाबत माहिती होतं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा प्रमाणेच शिल्पानेही पोलिसांना सांगितंल की, तिचाही या व्हिडीओंशी काहीही संबंध नाही, ज्या व्हिडीओंना क्राईम ब्रांच पॉर्नोग्राफिक म्हणत आहे.
राज कंद्राने सांगितलं की, सर्व गोष्टी त्याचा मेव्हणा प्रदीप बक्शी लंडनहून चालवत होता. तो केवळ व्हॉट्सअॅपवर बोलत असते. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे आहेत. ज्यावरुन यासर्व प्रकरणाचा कर्ताधर्ता राज कुंद्राच आहे, हे स्पष्ट होईल. अशातच मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अशी कोणतीच माहिती मिळाली नाही, ज्यावरुन शिल्पा शेट्टीचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Raj Kundra Case :अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्रा यांची हायकोर्टात याचिका
- Raj Kundra : 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल
- Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य
- Raj Kundra : 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल
- Raj Kundra Whatsapp Chat : पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी राज कुंद्राकडे रेडी होता 'Plan B'; पीएच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा