एक्स्प्लोर

Comedian Sunil Pal: पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् स्टेजवरुन हाकलवलं, इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं? सुनील पाल म्हणाला, 'मला अपमानित..'

Sunil Pal Reacts After Being Ignored on Stage: नुकताच सुनील पाल यांचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओवर सुनील पालने प्रतिक्रिया दिली आहे.

Comedian Sunil Pal Poetry Event Controversy: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पालने (Sunil Pal) प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलं. आपल्या कॉमेडीतून (Comedy) त्यानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.  ते नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या सुनील पाल एका कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. त्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आपण पाह शकतो की, त्याचा अपमान (Sunil Pal Video) करण्यात आला आहे. सुनील पालला  एका इव्हेंटमध्ये स्टेजवर बोलावण्यात येते. मात्र, त्याला बोलण्याची कोणतीही संधी देण्यात येत नाही.  या प्रकरणावर सुनील पालने प्रतिक्रिया दिली आहे. सुनील पाल नेमकं काय म्हणाला? पाहूयात.

सुनील पाल. हे कॉमेडी विश्वातील सुप्रसिद्ध नाव.  त्यानं आपल्या कारकि‍र्दीत कॉमेडी शोमध्ये सहभाग घेऊन विजेतेपद पटकावलं आहे.  त्यानं अलिकडेच मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. या इव्हेंटमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला.  याचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की,  सुनील पालला स्टेजवर बोलावण्यात येते.   त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो.  तेव्हा जो व्यक्ती सुनील पालचा सन्मान करतो,  तो त्याला स्टेजवरुन जायला सांगतो.  

सुनील पाल माईकवर धन्यवाद बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला रोखलं जातं, तसेच जागेवर बसण्यास सांगितलं जातं.   याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर सुनील पालनं स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया   दिली आहे. एका मुलाखीत सुनील पाल म्हणाला,  'मी ज्या इव्हेंटमध्ये गेलो होतो, तो शायरी इव्हेंट होता.  मित्राच्या सांगण्यावरुन शायरी इव्हेंटला गेलो होतो.   मला तिथे खूप मजा येत होती. मला उपस्थित कवींचे कौतुक करायचे होते. मला त्यांचा सन्मान करायचा होता.   परंतु, होस्टने मला माईकच दिलं नाही', असं सुनील पाल म्हणाला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaryav Saawara (@officialaaryavsaawara)

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की,  सुनील पालला स्टेजवर बोलावण्यात येते.  पुष्पगुच्छ देत त्याचा सन्मान करण्यात येतो. उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी तो माईक जवळ जातो. परंतु, त्याला जागेवर बसण्यास सांगितले जाते.   यामुळे तो शोमधून निघून जातो. सुनील पालने आपल्या मुलाखतीत, त्या क्षणी खूप अस्वस्थ वाटले असल्याचं सांगितलं. 'खरंतर तेव्हा मला खूप अस्वस्थ आणि गोंधळल्यासारखं वाटलं होतं. मी होस्टला वारंवार, प्रेक्षकांना माईकवर धन्यवाद बोलायचे आहे, अशी विनंती केली होती. परंतु, त्याने माईक बाजूला केला.  माईकशिवाय मी लोकांचे आभार व्यक्त केले.  तसेच होस्टला तुमचे मन खूप लहान आहे, असे म्हटले'.

सुनील पालच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.   सुनील पालसोबत अत्यंत चुकीच घडलं असल्याचं काहींचं म्हणणं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'नवरा माझा नवसाचा'फेम अभिनेत्याची मुलगी लग्नाआधीच सासरी राहायला गेली, मुलाखतीत कारण देत स्पष्टच म्हणाले..

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget