एक्स्प्लोर

भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत? ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल

Bharti Singh And Harsh Drugs Case : कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Bharti Singh And Harsh Drugs Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर मनोरंजन उद्योगाशी संबंधित अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती. यामध्ये कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांचाही सहभाग होता. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी (Drug Case) कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. एनसीबीनं (NCB) या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं असून लवकरच या दोघांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे. दरम्यान, ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी दोघांनाही एनसीबीनं अटक केली होती. सध्या दोघंही जामीनावर बाहेर आहेत. 

घरातून ड्रग्ज जप्त 

एनसीबीनं ड्रग्ज केस प्रकरणात एका ड्रग पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर भारती आणि हर्षच्या ऑफिस आणि घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्यांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीनं ताब्यात घेतलं. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ भारतीचा पती हर्ष लिम्बाचियालादेखील अटक करण्यात आली. भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. 

21 नोव्हेंबर 2020 रोजी, NCB नं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन-हाऊस ऑफिस आणि घरावर छापा टाकला होता. या छाप्यात दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी न्यायालयानं त्यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या जोडप्याला 23 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्येकी 15 हजार रुपयांची जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. 

त्यानंतर एनसीबीने सत्र न्यायालयासमोर याचिका दाखल करून, फिर्यादीचं म्हणणं न ऐकता जामीन मंजूर केल्याचा दावा केला होता. केंद्रीय एजन्सीने मॅजिस्ट्रेटच्या आदेशाला "विकृत, बेकायदेशीर आणि कायद्यानं वाईट" म्हटलं होतं. 

दरम्यान, 14 जून 2022 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटही समोर आलं होतं. याचप्रकरणात अभिनेत्री रिझा चक्रवर्ती आणि तिच्या भावालही एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. याव्यतिरिक्त सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी अनेक सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. याच प्रकरणात भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची नावंही समोर आली होती. एनसीबीनं दोघांच्या ऑफिस आणि घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याचप्रकरणी आता एनसीबीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget