एक्स्प्लोर

Colors Marathi Aai Tuljabhavani: पाताळदेवीला आव्हान देण्यासाठी आई तुळजाभवानी सज्ज, दिव्य स्वास्तिकाचा निर्णायक महिना उलगडणार

Colors Marathi Aai Tuljabhavani Serial: जुलै महिन्यात 'आई तुळजाभवानी' या मालिकेत प्रेक्षकांना 'दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना' पाहायला मिळणार आहे.

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) मध्ये प्रेक्षकांना 'दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना' (Entertainment) पाहायला मिळणार आहे. मालिकेत मानवी मनाला छळणाऱ्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या 4 भयंकर विकारांविरुद्ध आई तुळजाई घनघोर युद्ध पुकारणार आहे. आदिशक्तीचे अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या 'दिव्य स्वस्तिकाचा' महिमा उलगडून सांगणारा आणि चार विकारांविरुद्ध रंगणारा हा दैवी महासंग्राम नक्की पहा या जुलै महिन्यात.

संपूर्ण भुलोकावर विकारांचे साम्राज्य निर्माण करून आगामी चातुर्मासात विघ्न निर्माण करण्यासाठी  पाताळातील एक अघोरी, आदिम शक्ती 'पाताळदेवी' जागृत झाली आहे. पाताळदेवीचा हा कट आणि तिची योजना त्यावर  आई तुळजा भवानी कसा मार्ग काढणार, कसे त्याला परतवून लावणार हे बघणे रंजक असणार आहे. पाताळदेवी भुजंगाच्या माध्यमातून एका निष्पाप कुटुंबाला लक्ष्य करून, मानवी मनाला कैद करणाऱ्या चार विकारांचा वणवा पेटवणार आहे. 

आई तुळजाभवानी यांनी घेतलेली भूमिका अत्यंत वेगळी आहे (Aai Tuljabhavani July Month Special Episode in Color Marathi)

अवकाशात प्रकट झालेल्या 'दिव्य स्वस्तिकातील' ताऱ्यांचे तेज लोकांच्या सत्कर्माने वाढणार आहे, पण पाताळदेवी ते तेज कायमचे विझवण्यासाठी आपला पहिला डाव खेळणार आहे. ब्रह्मांडात निर्माण झालेल्या या अभूतपूर्व संकटामुळे आता युद्धाची ठिणगी पडली आहे. या दुष्ट विकारांविरुद्ध तुळजाईने  घनघोर युद्ध पुकारले आहे. विशेष म्हणजे झुंजायाला बळ देणारी समस्त भक्तांची कुलदैवता असलेल्या आई तुळजाभवानीने  घेतलेली भूमिकाही वेगळी आहे. 

"मला भक्तांची संकटं नाहीशी करायची नाहीत, तर त्यांना संकटांवर मात करण्याची शक्ती द्यायची आहे," हा आई तुळजाईचा खणखणीत निर्धार प्रत्येक सामान्य प्रेक्षकामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. पाताळदेवीच्या अशुभाच्या सावलीतून आणि भुजंगाच्या नव्या पाताळी मायावी शक्तीपासून  आई तुळजाभवानी आपल्या भक्तांचे रक्षण कशी करणार? भाग्यकुंभावर उमटणारे 'स्वस्तिक' कोणते नवे चमत्कार घडवणार? हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. भक्ती आणि दुष्ट शक्तीच्या या अद्वितीय महायुद्धाचा साक्षीदार होण्यासाठी दररोज रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी आई तुळजाभवानी ही सिरिअल कलर्स मराठीवर नक्की पाहा.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'अजुनही मला धोका आहेच...', बर्थ डेच्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीला काय झालं? नुकतीच दुबईहून भारतात परतली, कारण...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget