एक्स्प्लोर

'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार

CJP On Kangana Ranaut Gutter Generation Comment: 'कॉकरोच जनता पार्टी'नं एक निवेदन जारी केलं. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं की, देशासाठी 'जनरेशन झेड'चं योगदान कंगना रनौतच्या योगदानापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे.

CJP On Kangana Ranaut Gutter Generation Comment: दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर (Jantar Mantar) इथल्या आंदोलनानंतर जेन-झींसमोर सरकार झुकलं आणि अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मात्र, हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील (Mandi Constituency In Himachal Pradesh) लोकसभा खासदार कंगना रनौतनं (Lok Sabha MP Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्य करुन जेन-झींवर (Gen-Z) तिखट वार केलेत. पण, यामुळेच आता कंगना स्वतःच वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. कंगनानं आपल्या इन्स्टा स्टोरीवर (Kangana Ranaut Insta Story) आंदोलकांना 'जनरेशन झेड' (Gen Z) न म्हणता 'जनरेशन गटार' (Generation Gutter) म्हटलंय. या वक्तव्याच्या प्रत्युत्तरात 'कॉकरोच जनता पार्टी'नं एक निवेदन जारी केलं. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं की, देशासाठी 'जनरेशन झेड'चं योगदान कंगना रनौतच्या योगदानापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे.

देशासाठी 'जनरेशन झेड'चं योगदान कंगनापेक्षा जास्तच... : CJP (CJP On Kangana Ranaut Gen Z Comment)

कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कॉकरोच जनता पार्टीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, "कंगना रनौतच्या तुलनेत 'जनरेशन झेड'नं देशासाठी जास्त काम केलंय आणि ते अजुनही करत आहेत. 'जनरेशन झेड'नं लोकशाहीवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे, जी गोष्टी करण्यात स्वतः कंगना अपयशी ठरली, ती गोष्ट जेन-झीनं करुन दाखवली आहे. त्यामुळे, या पिढीचं वर्णन करताना त्यांनी भान राखलं पाहिजे. कंगना रनौतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं की, तिच्यात गांभीर्याचा अभाव आहे आणि तिचा स्वतःचा पक्षही तिला गांभीर्यानं घेत नाही. 

कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय? (Kangana Ranaut Gutter Generation Comment)

जंतरमंतर इथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांना कंगना रनौतनं 'जेन-झी' ऐवजी 'जनरेशन गटार' असं म्हटलेलं. आंदोलनादरम्यान तरुणांनी वापरलेल्या भाषेबद्दलही तिनं नाराजी व्यक्त केलेली आणि ती भाषा 'मळमळ आणणारी' आणि 'असंस्कृत' असल्याचं म्हटलेलं. इतकंच काय तर, तिनं आंदोलकांच्या संस्कारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंगनानं सोशल मीडियावर लिहिलं की, "छे! या लोकांना कोण जन्म देतंय आणि त्यांचं संगोपन कसं केलं जातंय? भारत हा सभ्यपणा आणि सांस्कृतिक जाणिवेवर आधारलेल्या विविध, सुंदर लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला झुरळं म्हणवून घेता आणि अगदी तसेच वागता..." तिनं पुढे म्हटलं की, या रील्स पाहून तिला अस्वस्थ वाटलं आणि तिला 'डिजिटल डिटॉक्स'ची गरज आहे.

स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार

हिंदू तरुणींबाबतही बरळली कंगना रनौत (Kangana Ranaut On Hindu Young Woman)

जंतरमंतर इथल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर निशाणा साधत कंगना रनौतनं दावा केलाय की, त्या अंमली पदार्थांचं सेवन, मद्यपान आणि कसलीही लाज न बाळगता पालकांच्या कमाईवर जगणं या गोष्टींनाच 'स्वातंत्र्य' मानतात आणि या लाईफस्टाईलचं प्रदर्शन करतात. तिनं म्हटलंय की, त्यापैकी काहींचं व्यवस्थेमध्ये कोणतंही योगदान नाही. कंगनानं पुढे असंही म्हटलंय की, त्या तरुणी इतक्या बिघडलेल्या आहेत की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget