Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Cirkus Song Sun Zara : 'सुन जरा' या गाण्यात रणवीरबरोबर जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे रोमान्स करताना दिसणार आहेत.
Cirkus Song Sun Zara : रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर एंटरटेनमेंट फिल्म 'सर्कस'मधील (Cirkus) मधील 'सुन जरा' (Sun Zara) हे गाणं लॉन्च झालं आहे. या गाण्यात रणवीरबरोबर जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) रोमान्स करताना दिसणार आहेत. अगदी रेट्रो लूकमधील हे गाणं फारंच सुंदर असं शूट करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
या गाण्याच्या सुरुवातीलाच जॅकलीन फर्नांडिसची एन्ट्री पाहायला मिळते. जॅकलीन रेड टॉप आणि ब्राऊन स्कर्टमध्ये डान्स करताना खूप सुंदर दिसतेय. तर, दुसरीकडे पूजा हेगडे पिवळ्या रंगाच्या साडीत अगदी मनमोहक दिसतेय. रणवीर सिंहचा लूकदेखील फार डॅशिंग आहे.
रणवीरने शेअर केलेला टीझर
बऱ्याच दिवसांपासून रणवीर सिंहचे चाहते या चित्रपटातील गाण्यांची आतुरतेने वाट पाहात होते. या संदर्भात काल स्वत: रणवीर सिंहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गोण्याचा टीझर पोस्ट केला होता. हा टीझर पाहूनच चाहत्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अखेर हे गाणं आज रिलीज झालं आहे.
'सर्कस'ची जबरदस्त स्टारकास्ट
या गाणं पाहून चाहत्यांना आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. रणवीर सिंह स्टारर 'सर्कस' या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अजय देवगण यांचाही कॅमिओ आहे. हा चित्रपट 1982 मध्ये आलेल्या 'अंगूर' या हिट चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरबरोबर, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय राजपाल यादव आणि जॉनी लीव्हर देखील कॉमेडीचा तडका देताना दिसणार आहेत. 'सर्कस'च्या स्टारकास्टमध्ये सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, व्रजेश हिरजी, विजय पाटकर, सुलभा आर्य, मुकेश तिवारी, अनिल चरणजीत, अश्विनी कळसेकर यांचा समावेश आहे. मुरली शर्मा यांचाही सिनेमात समावेश आहे.
'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' नंतर 'सर्कस' हा रणवीर सिंहचा रोहित शेट्टीबरोबरचा (Rohit Shetty) तिसरा सिनेमा आहे. या चित्रपटात रणवीर सिंहची दुहेरी भूमिका आहे. सर्कस हा सिनेमा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :