एक्स्प्लोर

Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत

Christopher Nolan The Odyssey Advance Booking: ख्रिस्तोफर नोलन यांचा 'द ओडिसी' सिनेमा लवकरच थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. देशभरातील IMAX शोसाठी 8 जून रोजी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि तिकिटांचे दर पाहून प्रेक्षक थक्क झालेत.

Christopher Nolan The Odyssey Advance Booking: ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) एखाद्या सिनेमाच्या मागे हे नाव लागलं की, विषय संपतो. ख्रिस्तोफर नोलन (Director Christopher Nolan) म्हणजे, जगविख्यात ब्रिटिश-अमेरिकन सिनेदिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक. 2023 मध्ये आलेला 'ओपनहायमर' (Oppenheimer) सिनेमा तुफान गाजला. त्यापूर्वीही ख्रिस्तोफर नोलनच्या अनेक सिनेमांची जगभरात चर्चा झाली आणि त्यांनी प्रतिष्ठेचा असा ऑस्करही आपल्या नावे केलाय. अशातच आता ख्रिस्तोफर नोलनचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. पण, रिलीजपूर्वीच या सिनेमाची जगभरात चर्चा रंगली आहे. 

ख्रिस्तोफर नोलन यांचा 'द ओडिसी' (The Odyssey) सिनेमा लवकरच थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. देशभरातील IMAX शोसाठी 8 जून रोजी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि तिकिटांचे दर पाहून प्रेक्षक थक्क झाले. मुंबई आणि पुण्यातील प्रीमियम सीट्सचे दर 3000 रुपयांपर्यंत होते, तर मुंबईतील काही रात्री उशिराच्या शोसाठी हे दर 3,300 रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे ही तिकिटं सध्या देशात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या सिनेमाच्या तिकिटांपैकी एक ठरली आहेत. दर जास्त असूनही मागणीत कोणतीही घट झाली नाही. अनेक शोचे बुकिंग रिलीजपूर्वीच हाऊसफुल्ल झालंय. दरम्यान, विविध शहरांमधील तिकिटांच्या दरांमधील मोठ्या तफावतीवरून ऑनलाईन चर्चा सुरू झाली. एकाच सिनेमाचा अनुभव घेण्याचा खर्च शहर आणि शोच्या वेळेनुसार इतका वेगळा कसा असू शकतो? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केलाय.

काही चाहत्यांनी याकडेही लक्ष वेधलंय की, जरी हा सिनेमा पूर्णपणे IMAX कॅमेरे वापरून चित्रित केला गेला असला, तरी भारतातील बहुतेक थिएटर्स तो 'IMAX 70mm' फॉरमॅटमध्ये प्रदर्शित करण्यासाठी सुसज्ज नाहीत, जो फॉरमॅट नोलन याच्या सिनेमां एक प्रमुख वैशिष्ट्य मानला जातो. अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चाहत्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका युजरनं लिहिलंय की, "#TheOdyssey साठी भारतातील आतापर्यंतचं सर्वात महाग तिकीट – पुणे IMAX मध्ये 3,000 रुपये. ख्रिस्तोफर नोलन हा इथे एक मोठा ब्रँड आहे!"

एका युजरनं लिहिलंय की, "भारतात The Odyssey ची क्रेज जबरदस्त आहे. तिकीटं काही सेकंदातच विकली गेलीत. असं तेव्हाच होतं, जेव्हा एखादी कास्ट किंवा दिग्दर्शक प्रमोशनसाठी भारतात आला नाही. ही ख्रिस्तोफर नोलनची लेगसी आहे. तिकीटं विकण्यासाठी फक्त त्याचं नावच खूप आहे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "भारतात THE ODYSSEY ची तिकीटं 3 हजार 200 रुपयांसारख्या मोठ्या किमतीला विकण्यात आली आणि सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे, काहीच मिनिटांमध्ये सोल्ड आऊटही झालीत.... नोलनची क्रेझ जबरदस्त आहे..."

The Odyssey सिनेमात काय दाखवलंय? (Director Christopher Nolan The Odyssey)

ऑस्कर जिंकणारा फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलननं लिहिलेली आणि त्यानं दिग्दर्शित केलेली ही फिल्म होमरच्या महाकाव्यावर आधारित आहे. यात इथाकाचा राजा ओडिसियस आणि ट्रॉयच्या पतनानंतर त्यानं मायदेशी परतण्यासाठी केलेल्या धोकादायक प्रवासाची कथा मांडली आहे. मॅट डॅमननं ओडिसियसची भूमिका साकारली आहे, तर टॉम हॉलंड आणि ॲन हॅथवे यांनी अनुक्रमे टेलिमाकस आणि पेनेलोप यांच्या भूमिका केल्या आहेत.

या सिनेमाच्या कलाकारांच्या फळीत जेंड्या, रॉबर्ट पॅटिनसन, लुपिता न्योंगो, चार्लीज थेरॉन आणि जॉन बर्नथल यांचाही समावेश आहे. 'द ओडिसी' (The Odyssey) हा दिग्दर्शक म्हणून नोलन यांचा 13 वा सिनेमा असून, याची निर्मिती एम्मा थॉमस आणि ख्रिस्तोफर नोलन यांनी त्यांच्या 'सिन्कोपी' (Syncopy) या बॅनरखाली केली आहे. हा सिनेमा 17 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

2 hour 38 minute Film Kara Beat Dhurandhar: 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला! 4 दिवसांतच नंबर वन ठरली 2 तास 38 मिनिटांची 'ही' फिल्म, पाहिलीय का तुम्ही?

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget