(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवंगत दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह
दिवंगत दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी आणि मुलगा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजा यांची पत्नी मेघना राज आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांच्याही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचसोबत मेघनाच्या आई-वडीलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेघना राज यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या चाहत्यांना चिंता न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी विश्वास दर्शवला आहे की, त्यांचा मुलगा, ज्याला कन्नड अभिनेते आणि चाहते ज्युनिअर चिरू म्हणतात, तो एकदम ठिक आहे. तसेच त्या त्याला आपल्यापासून दूर करतच नाहीत.
मेघना राज यांची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
मेघना राज यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं आहे की, "सर्वांना माझा नमस्कार, माझे वडील, आई, मी स्वतः आणि माझ्या बाळाला कोरोनाची लागण झाली असून कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली असून काळजी घेण्यासही सांगितलं आहे. मला चिरू आणि माझ्या चाहत्यांना सागायचं आहे की, आम्ही सर्व ठिक आहोत... जूनियर सी (Junior C) देखील ठिक आहे. आम्ही एकत्र येऊन ही लढाई लढणार असून ती जिंकणार आहोत."
दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजा यांची पत्नी मेघना राज यांनी ऑक्टोबरमध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. ज्याला चिरंजीवी सरजा यांचे चाहते ज्युनिअर चिरू असं म्हणतात. बाळाच्या जन्माआधी काही महिन्यांपूर्वीच चिरंजीवी सरजा याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. चिरंजीवी सरजाने चंद्रलेखा, औतार, भारजारी, सेजियर, अम्मा आय लव्ह यू, सिंजंगा इत्यादी सिनेमांमध्ये अभिनय केला होता. शिवार्जुन हा चिरंजीवी सरजाचा शेवटचा सिनेमा ठरला.
चिरंजीवी सरजाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दिली सुरुवात केली होती. अभिनेता म्हणून 2009 मध्ये आलेला 'वायुपूत्र' सिनेमा त्याच्या कारकिर्दितला पहिला सिनेमा होता. त्याने 20 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता. दक्षिण सिनेसृष्टीतील स्टार अर्जुन सरजाचा पुतण्या आणि अॅक्शन राजकुमार ध्रुव सरजाचा चिरंजीवी सरजा भाऊ होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :