एक्स्प्लोर

Chhava Teaser: भेदक नजर, घोगरा आवाज... छावा चित्रपटात वृद्ध औरंगजेब पडद्यावर जिवंत करणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?

Chhava Bollywood Movie: स्वराज्याचे धाकले धनी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील 'छावा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत, औरंगजेबाच्या भूमिकेतील अभिनेता कोण?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' या बहुचर्चित चित्रपटाचा नवा टिझर अखेर प्रदर्शित झाला आहे. 'छावा'चा हा ॲक्शनपॅक्ड टिझर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. आजवर संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कहाण्या या टिझरच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर जिवंत होताना दिसत आहेत. अभिनेता विकी कौशल 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj)  भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा टिझर पाहता विकी या भूमिकेत एकदम परफेक्ट वाटत आहे. छावाचा टिझर (Chhava Teaser) प्रदर्शित झाल्यापासून विकी कौशलचा लूक, ट्रेलरमध्ये दिसणारे युद्धाचे कमाल प्रसंग या सगळ्याची जोरदार चर्चा आहे. 

आता छत्रपती संभाजी महाराज महाराज म्हटले की, ओघाने स्वराज्याचा शत्रू औरंगजेबही आलाच. 'छावा'च्या टिझरमध्ये (Chhava)  औरंगजेबाचीही झलक पाहायला मिळत आहे. 'सिवा गया, पर अपनी सोच जिंदा छोड गया' असा डायलॉग औरंगजेबाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तोंडी आहे. सुरुवातीला या ॲक्शनपॅक्ड टिझरमधील विकीच्या दिसण्याचीच जोरदार चर्चा होती. मात्र, या टिझरमध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसणारा अभिनेता कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. अनेकांनी याचा शोध घेतला. तेव्हा औरंगजेबाची भूमिका साकारणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना (Akshay Khanna) असल्याचे समोर आले आहे. 

औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना अजिबात ओळखू येत नाही. त्यामुळे टिझरमध्ये दिसणारा वृद्ध औरंगजेब म्हणजे अक्षय खन्ना आहे, यावर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, काहीवेळानंतर औरंगजेब म्हणजे अक्षय खन्नाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता 'छावा'मधील विकी कौशलच्या लूकबरोबर अक्षय खन्नाच्या कमाल ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. वृद्ध औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना हा कमालीचा वेगळा दिसत आहे.  'सिवा गया, पर अपनी सोच जिंदा छोड गया' या एका डायलॉगने अक्षय खन्नाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  त्यामुळे आता छावा चित्रपटात विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. 

छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते, दिव्या दत्ता ही सोयराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, अभिनेता संतोष जुवेकरही या चित्रपटात दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणखी वाचा

डोळ्यात आग...स्वराज्य रक्षणाचा ध्यास; अंगावर काटा आणणाऱ्या 'छावा'चा टीझर पाहिलात का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget