एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 7: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुस्साट... फक्त सातच दिवसांत विक्रमांचे डोंगर रचले; 'जवान', 'दंगल' अन् 'स्त्री 2'चे रेकॉर्ड्स मातीमोल

Chhaava Box Office Collection: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं रिलीजच्या आठवड्यातच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट तुफानी वेगानं कमाई करत आहे आणि सात दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त व्यवसाय करत आहे.

Chhaava Box Office Collection Day 7: लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून अपेक्षेपेक्षा चांगला व्यवसाय करत आहे. 'छावा' (Chhaava Movie) हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता, आता हे स्पष्ट झालंय की, बॉक्स ऑफिसवर 'छावा' लंबी रेस का घोड़ा ठरेल. 'छावा'नं रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या गुरुवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा'नं रिलीजच्या 7 व्या दिवशी किती कमाई केली?

'छावा' नं कमाल केलीय. या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचबरोबर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. 'छावा' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची कथा आणि विक्की कौशलच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'छावा'नं केवळ चांगली सुरुवात केली नाही तर, सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी आणि आठवड्याच्या दिवसांमध्येही भरपूर कमाई केली. आता 'छावा'नं थिएटरमध्ये सात दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि यासोबतच त्यानं 200 कोटींचा टप्पाही ओलांडला आहे. यासह, 'छावा' हा 2025 सालचा पहिला 200 कोटींचा चित्रपट बनला आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो तर

  • सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 31 कोटी होतं.
  • दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 37 कोटी रुपये कमावले
  • 'छावा'ने तिसऱ्या दिवशी 48.5 कोटींची कमाई केली.
  • 'छावा'ने चौथ्या दिवशी 24 कोटींची कमाई केली
  • पाचव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 25.25 कोटी रुपये होते.
  • 'छावा'ने सहाव्या दिवशी 32 कोटी रुपये कमावले.
  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 7 व्या दिवशी म्हणजेच पहिल्या गुरुवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छवा'ने सातव्या दिवशी 22 कोटींचा गल्ला जमवला आहे.
  • यासह, 'छावा'ची 7 दिवसांत एकूण कमाई आता 219.75 कोटी रुपये झाली आहे.

'छावा'नं सात दिवसांत तोडले जवान-दंगल अन् स्त्री 2 चे रेकॉर्ड्स 

'छावा'नं रिलीजच्या 7 दिवसांत पुन्हा एकदा दमदार कलेक्शन करुन जवान, दंगल आणि स्त्री 2 सारख्या फिल्म्सचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. यासोबतच फिल्म 22 कोटी कलेक्शच्या सातव्या दिवशी आठवी सर्वाधित कमाई करणारी फिल्म ठरली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'छावा'नं ज्या फिल्म्सच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे रेकॉर्ड्स ब्रेक केलेत, त्यामध्ये 

  • 'जवान'नं सातव्या दिवशी 21.3 कोटी रुपये कमावले.
  • दंगलचं सातव्या दिवसाचं कलेक्शन 19.89 कोटी रुपये होतं.
  • चेन्नई एक्सप्रेसनं सातव्या दिवशी 19.6 कोटी रुपये कमावले.
  • स्त्री 2 चं 7 व्या दिवसाचं कलेक्शन 19.5 कोटी रुपये होतं.

'छावा'चं लक्ष्य आता 250 कोटींचा क्लब

130 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'छावा' चित्रपटानं अवघ्या एका आठवड्यात त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त कमाई केली आहे. या चित्रपटानं 200 कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्याच वेळी, निर्मात्यांना आशा आहे की 'छावा'ची कमाई आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा वाढेल आणि ती 250 कोटी रुपयांचा आकडा सहज ओलांडू शकेल. यासह, हा चित्रपट विक्की कौशलच्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनचा (245.36 कोटी) विक्रम मोडेल आणि अभिनेत्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळलेल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal : प्रत्येक सीनसाठी विकी कौशलची जीवतोड मेहनत, एकदा हातही फ्रॅक्चर झाला, अंगावर काटा आणणाऱ्या छावा सिनेमाचं शूटींग कुठं झालंय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून...; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video
Ram Sutar Passes Away: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
U19 Asia Cup 2025 Semifinal Schedule : सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule
सेमीफायनलचं चित्र स्पष्ट, 4 संघ निश्चित! भारत श्रीलंकेविरुद्ध सामना, पाकिस्तान कोणाशी भिडणार?, वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, कधी होणार सामना?, जाणून घ्या Schedule
Ravindra Dhangekar: शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं
शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटले, पण वाल्मिक कराडबाबतच्या निर्णयामुळे मंत्रिपदाचं स्वप्न अधुरं राहणार?
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटले, पण वाल्मिक कराडबाबतच्या निर्णयामुळे मंत्रिपदाचं स्वप्न अधुरं राहणार?
Embed widget