दक्षिण कोरियातील अभिनेत्याचा मृतदेह कारमध्ये सापडला, अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये केलं होतं काम
Song Young Kyu Died : दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध अभिनेता Song Young Kyu यांचा मृत्यू झालाय. पोलिसांना अभिनेत्याचा मृतदेह एका कारमध्ये सापडला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Song Young Kyu Died : साउथ कोरियातील प्रसिद्ध अभिनेता सोंग यंग-क्यू यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. केवळ 55 व्या वर्षीच या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळून आला. मात्र, अद्याप त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
कारमध्ये मृतावस्थेत सापडले अभिनेता सोंग यंग-क्यू
न्यूज एजन्सी पीटीआयच्या अहवालानुसार, अभिनेता सोंग यंग-क्यू यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला. ही कार रविवारी ग्योंगगी प्रांतातील योंगिन येथील एका टाउनहाऊसच्या आवारात आढळली होती. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोंग यंग-क्यू कोण होते?
सोंग यंग-क्यू हे दक्षिण कोरियाचे एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपला करिअर 1994 साली ‘विझार्ड म्यूरल’ या चाइल्ड म्युझिक ड्रामा द्वारे सुरू केला होता. त्यानंतर ते लवकरच कोरियामधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनले. ‘बिग बेट’, ‘ह्वारंग’ आणि ‘हॉट स्टोव लीग’ यांसारख्या के-ड्रामामध्ये त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
अलीकडे सोंग यंग-क्यू यांना झाली होती अटक
सोंग यंग-क्यू हे त्यांच्या शोजपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील बातम्यांमुळे अधिक चर्चेत राहिले. काही दिवसांपूर्वी त्यांना नशेत कार चालविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या घटनेचा त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. त्यांना अनेक शोजमधून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं, तर ते विवाहित होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























