Mary Kom Onler Divorce: ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचं लग्न मोडलं? 20 वर्षांपूर्वी फुटबॉलरसोबत थाटलेला संसार, आता बिझनेसमनच्या प्रेमात?
Mary Kom Onler Divorce: भारताची महान बॉक्सर एमसी मेरी कोम आणि तिचा पती लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Mary Kom Onler Divorce: ऑलिम्पिक पदक विजेती (Olympic Medalist) मेरी कोमचा (Mary Kom) अख्खा देश आभारी आहे. मेरी कोमच्या नावावर तब्बल आठ जागतिक अजिंक्यपद पदकं (World Championship Medals) आहेत. 42 वर्षांची बॉक्सिंग आयकॉन मेरी कोम (Boxing Icon Mary Kom) तिच्या बॉक्सिंग स्किल्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या ती तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत आली आहे. मेरी कोम आपल्या पतीसोबतचा सुखी संसारातून काडीमोड घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
भारताची महान बॉक्सर एमसी मेरी कोम आणि तिचा पती करूंग ओंखोलर (ऑनलर) यांच्यात सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याचं सांगितलं जात आहे. नात्यात सातत्यानं होणाऱ्या वाद-विवादानंतर आता दोघांनीही सुखी संसार मोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मेरी कोम ही बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. तिनं 20 वर्षांपूर्वी ऑनलरशी आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांनी अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. पण, लवकरच दोघेही कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पर्ण करून एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
2022 पासून दोघांच्या नात्यात तणाव
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात 2022 पासून तणाव सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ऑनलर उतरला होता. पण, या निवडणुकीत त्याला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी कुटुंबाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉक्सर मेरी कोम आणि तिची चार मुलं फरीदाबादमध्ये राहतात. तर, तिचा पती ऑनरल कुटुंबातील काही सदस्यांसह दिल्लीत राहतो.
View this post on Instagram
बिजनेस पार्टनरसोबत अफेअरच्या चर्चा
मेरी कोम आणि ऑनलर एकमेकांपासून वेगळे होण्याच्या चर्चांमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. महान बॉक्सर मेरी कोम एका बिजनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या पतीपासून वेगळं झाल्यानंतर मेरी कोमच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहर आला आहे. ती आपल्या बिजनेस पार्टनरला डेट करत आहे. असं बोललं जात आहे की, मेरी कॉम ज्या बिजनेसमनला डेट करत असल्याच्या अफवा आहेत, तो दुसऱ्या एका बॉक्सरचा पती आहे.
मेरी कोम ज्या बिजनेस पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत, त्यांचं नाव हितेश चौधरी असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हितेश चौधरी मेरी कोमचे बिजनेस पार्टनर आणि मेरी कोम फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. हितेश चौधरी यांनी मेरी कोमसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आलं. हितेश चौधरी क्रिकेटर असून मेरी कोमसोबत बिजनेसही सांभाळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























