'बॉर्डर 2' चित्रपटातील डोळ्यात अश्रू आणणारे गाणं रिलीज; सनी देओलही झाला भावुक, पाहा VIDEO
Ghar Kab Aaoge from Border 2: 'घर कब आओगे' गाणं रिलीज, सनी देओलच्या डोळ्यातून भावना स्पष्ट; VIDEO पाहून तुमचेही अश्रू ढासळणार

Border 2 First Song Launch: 2026 ला सुरूवात झाली. बॉलिवूडमध्ये सध्या बॉर्डर 2 (Border 2) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल. सनी देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा लूक रिलीज झाला. तसेच बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं. या सिनेमातील गाण्याचे लाँच कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात 'घर कब आओगे' हे गाणं लाँच करण्यात आलं. 'घर कब आओगे' या गाण्याशी अनेकांच्या भावना जोडल्या आहेत. या गाण्याच्या लाँच कार्यक्रमात अनेक जण भावुक झाले. हा कार्यक्रम राष्ट्रीय गौरव आणि सामूहिक भावनेचा क्षण बनला होता.
'घर कब आओगे' या आयकॉनिक गाण्याच्या व्हिडिओमध्ये सनी देओल, वरूण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हे गाणे रूपकुमार राठोड, सोनू निगम, अरिजीत सिंग, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी गायले आहे. व्हिडिओमध्ये वरूण धवन एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्याची सुरूवात कलाकार सहकारी सैनिकांसह करतात. हळूहळू सर्व जण एकत्र येतात, तसेच आपल्या प्रियजनांची आठवण काढून गाणं गातात.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेता सनी देओल जेव्हा फ्रेममध्ये येतो, तेव्हा हे गाणे भावनिक वळण घेते. सनी देओल पत्र वाचत असतो. पत्र वाचत असताना सनी देओलचे डोळे वेदना आणि अश्रुंनी भरतात. सनी इकडे तिकडे भटकत असतो. विचारांमध्ये हरवतो. त्याचे जुने दिवस त्याला आठवतात. सैन्यातील जुने मित्रही त्याला आठवतात. या गाण्यात दिलजीत दोसांझ वायुसेनेचा पायलट आणि अहान शेट्टी नौदलाच्या अधिकार्याची भूमिका साकारत आहे. हा कार्यक्रम फक्त गाण्याचे लाँचिंग नव्हते. तर बॉर्डर 2साठी एक महत्त्वाचा टप्पाही होता. जिथे देशाच्या सीमेवर वास्तविक जीवनातील शौर्य एकत्र दाखवण्यात आले.
या गाण्यात आपल्याला महिला कलाकारांची झलकही पाहायला मिळते. मोना सिंह सनी देओलसोबत, सोनम बाजवा दिलजीत दोसांजसोबत, आन्या शर्मा अहान शेट्टीसोबत आणि मेधा राणा वरूण धवनसोबत दिसत आहे. हे गाणे ऐकून तुम्हाला 'संदेसे आते है' या गाण्याची आठवण येईल. हे गाणे ऐकून तुम्ही देखील भावनिक व्हाल. बॉर्डर २ या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित हा चित्रपट 23 जानेवारी 2026 ला सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
























