Kusha Kapila: 'हे लज्जास्पद आहे...'; घटस्फोटानंतर ट्रोल करणाऱ्यांवर भडकला जोरावर, कुशावर टीका करणाऱ्यांनाही दिलं सडेतोड उत्तर
अनेक जण कुशाला (Kusha Kapila) घटस्फोट घेतल्यामुळे ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला जोरावरनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Kusha Kapila: लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिला (Kusha Kapila) आणि जोरावर सिंह अहलुवालिया (Zorawar Singh Ahluwalia) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कुशा आणि जोरावर यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. आता अनेक जण कुशाला घटस्फोट घेतल्यामुळे ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला जोरावरनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
जोरावरची पोस्ट
जोरावरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'आम्ही सार्वजनिक जीवन जगतो हे आम्हाला जाणले, परंतु तरीही आपण काही गोष्टी पवित्र मानल्या पाहिजेत. आमचा विवाह आणि एकमेकांबद्दलचा आदर त्यांपैकी एक आहे. घटस्फोट हा आमचा लग्नासारखाच एक निर्णय होता जो आम्ही दोघांनी मिळून खूप विचार करून घेतला होता. हा एक कठीण आणि क्लेशदायक निर्णय होता, पण आमच्या दोघांच्या भल्यासाठी आम्ही एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय आहे. गेल्या 24 तासांत जे घडले आहे, सोशल मीडियावर लोक कुशावर टीका करत आहेत, त्यामुळे मी दुःखी आणि निराश झालो आहे. कुशाच्या चरित्रावर टीका करून तिला खलनायक म्हणणे हे लज्जास्पद आहे.' जोरावरच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
"जोरावर (Zorawar Singh Ahluwalia) आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा निर्णय खरचं सोपा नव्हता. पण आयुष्यातील या टप्प्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे" अशी पोस्ट शेअर करुन कुशानं तिच्या घटस्फोटोची माहिती चाहत्यांना दिली होती.
2017 मध्ये कुशा आणि जोरावर यांनी लग्न केले. दोघेही सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आहेत. जोरावरला इन्स्टाग्रामवर 93K फॉलोवर्स आहेत. तर कुशाला 3.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. कुशानं अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि रितेश देशमुखच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमातदेखील तिने काम केलं आहे. तसेच कुशानं मसाबा मसाबा या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
कुशानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, कुशा एका मुलाखतीत म्हणाली होती की,"सात वर्षांपूर्वी मी एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्याला गेली होती. या लग्नसोहळ्यात जोरावर आणि माझी पहिली भेट झाली. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला"
View this post on Instagram
संबंधित बातम्या