एक्स्प्लोर

Kusha Kapila Divorce : "निर्णय घेणं कठीण होतं"; लग्नानंतर सहा वर्षांनी लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिलाचा घटस्फोट

Kusha Kapila : लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिलाचा घटस्फोट झाला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.

Kusha Kapila Announces Divorce : लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिला (Kusha Kapila) सध्या चर्चेत आहे. लग्नाच्या सहा वर्षांनी कुशा कपिलचा घटस्फोट झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

कुशा कपिलाची पोस्ट काय आहे? (Kusha Kapila Post)

कुशा कपिलाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना घटस्फोट झाल्याचं सांगितलं आहे. तिने लिहिलं आहे,"जोरावर (Zorawar Singh Ahluwalia) आणि मी परस्पर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा निर्णय खरचं सोपा नव्हता. पण आयुष्यातील या टप्प्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे". 

कुशाने पुढे लिहिलं आहे,"नातेसंबंधनाचा शेवट हा कटू असतो. आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी हे खरचं खूप कठीण होतं. आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. परंतू आम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला आहे. आता आयुष्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. आम्ही एकमेकांचा नक्कीच आदर करतो". 

View this post on Instagram
 
A post shared by Kusha Kapila (@kushakapila)

कुशा आणि जोरावर अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2017 साली ते लग्नबंधनात अडकले. त्याच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य करताना 2019 साली कुशा एका मुलाखतीत म्हणाली होती की,"सात वर्षांपूर्वी मी एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्याला गेली होती. या लग्नसोहळ्यात जोरावर आणि माझी पहिली भेट झाली. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला". 

कुशा कपिलाबद्दल जाणून घ्या... (Who Is Kusha Kapila)

कुशा कपिला फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसून मनोरंजनसृष्टीतदेखील तिने काम केलं आहे. अनेक वेबसीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती कपिल शर्माच्या शोमध्ये दिसली होती. या कार्यक्रमादरम्यान तिने जोरावरबद्दल भाष्य केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, कुशा जाहिराती आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमावते. कुशी बॉलिवूडमध्येही झळकली आहे. अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि रितेश देशमुखच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमातदेखील तिने काम केलं आहे. तसेच छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली आहे. 

संबंधित बातम्या

Devraj Patel : देवराज पटेल कोण आहे? रस्ते अपघातात युट्यूबरचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तरJob Majha : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray bodyguard :सभास्थळी जाण्यापासून सुरक्षारक्षकांना पोलिसांनी रोखलं, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Headlines | 06 PM TOP Headlines 6 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Embed widget