(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devraj Patel : देवराज पटेल कोण आहे? रस्ते अपघातात युट्यूबरचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन
Devraj Patel : लोकप्रिय युट्यूबर आणि विनोदवीर देवराज पटेल याचे निधन झाले आहे.
Devraj Patel : देवराज पटेल (Devraj Patel) हा एक लोकप्रिय युट्यूबर (Youtuber) आणि विनोदवीर (Comedian) असून रस्ते अपघातात त्याचे निधन झाले आहे. 'दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई' (Dil Se Bura Lagta Hai Bhai) या मीम मुळे तो चर्चेत आला होता. आता छत्तीसगडमधील रायपूर येथे एका रस्ते अपघातात त्याचे निधन झाले असून वयाच्या 21 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.
देवराजचे युट्युबवर लाखो सबस्क्राइबर्स
देवराज पटेल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. युट्यूबवर त्याचे चार लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील मजेशीर व्हिडीओ बनवत असे. त्याचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असे. त्याच्या युट्यूब व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळायचे. विनोदी व्हिडीओंच्या माध्यमातून तो चाहत्यांचं मनोरंजन करत असे.
View this post on Instagram
देवराज पटेल कोण आहे? (Who Is Devraj Patel)
देवराज हा महासमुंद जिल्ह्यातील दाब पाली गावचा रहिवासी होता. त्यांचे कुटुंबीय आजही याच गावात राहतात. देवराजच्या वडिलांचे नाव घनश्याम पटेल असून ते आजही शेती करतात. तर देवराजला एक भाऊ असून त्याचं नाव हेमंत आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या देवराजची आई गृहिणी आहे.
देवराजने 2021 मध्ये लोकप्रिय युट्यूबर भुवन बामसोबत (Bhuvan Balm) 'धिंडोरा' या वेबसीरिजमध्येही काम केलं होतं. तसेच छत्तीसगड सरकारच्या माहितीपटातदेखील त्याने काम केलं होतं. गेल्या वर्षी त्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला. आता त्याच्या निधनावर भूपेश बघेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच निधनाच्या काही तास आधी देवराजनेदेखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
देवराजचे इंस्टाग्रामवर 58.4 हजार फॉलोअर्स आहेत. 'नमस्कार मित्रांनो मी तुमचा देवा...', असं म्हणत तो त्याच्या प्रत्येक व्हिडीओची सुरुवात करत असतो. 'दिल से बुरा लगता है' हा त्याचा सर्वात लोकप्रिय डायलॉग आहे. वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारा देवराज सध्या बीएच्या शेवटच्या वर्षाला होता.
संबंधित बातम्या