(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सारा आणि विकीच्या चित्रपटानं पाचव्या दिवशी केली एवढी कमाई
'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी किती कमाई केली? ते जाणून घेऊयात...
Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 5: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मात्र, सोमवारी आणि आता मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली होती. 'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी किती कमाई केली? ते जाणून घेऊयात...
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित जरा हटके जरा बचके या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये विकी आणि सारा यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटात दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तरण आदर्श यांनी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटानं रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (6 जून) 2.27 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 30.60 कोटी एवढी झाली आहे.
View this post on Instagram
'जरा हटके जरा बचके' ची हटके लव्ह स्टोरी
'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटातील गाणीही लोकांना आवडत आहेत. या चित्रपटाची कथा कपिल (विकी कौशल) आणि सौम्या (सारा अली खान) या जोडप्यावर आधारित आहे. दोघे लग्न करतात पण लग्नानंतर त्यांना घरात प्रायव्हसी मिळत नाही. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी चित्रपटानंतर विकीचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. तर साराच्या लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता त्या दोघांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
संबंधित बातम्या