Mental Health : ‘आईमुळे मी नैराश्यातून बाहेर पडू शकले!’, दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा डिप्रेशनवर केलं भाष्य
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नेहमीच मानसिक आरोग्याबाबत बोलत असते. तिने स्वत: देखील नैराश्याचा सामना केला आहे.
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) नेहमीच मानसिक आरोग्याबाबत बोलत असते. तिने स्वत: देखील नैराश्याचा सामना केला आहे. अभिनेत्री सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे असून, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशन लिव्ह-लव्ह-लाफच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीने मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नैराश्याला कसे सामोरे जावे आणि या दरम्यान स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल तिने सांगितले आहे.
दीपिकाने स्वतः आयुष्यात डिप्रेशनचा सामना केला आहे. केवळ डिप्रेशनच नाही तर कधी कधी तिला आत्महत्येचे विचारही मनात यायचे. या वेळी दीपिकाने तिच्या या कठीण दिवसांत तिला झालेल्या त्रासाचे अनेक प्रसंगही शेअर केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने पुन्हा एकदा दीपिकाने तिच्या डिप्रेशनच्या दिवसांवर भाष्य केले आहे.
म्हणून दीपिकाने स्थापन केली संस्था..
सध्या अभिनेत्री तमिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये आहे. दीपिका पदुकोण 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिचे मानसिक आरोग्य फाउंडेशन Live-Love-Laugh च्या ग्रामीण समुदाय मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा विस्तार करत आहे. या दरम्यान ती डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य याविषयी जनजागृती निर्माण करत आहे. 2015 मध्ये दीपिकाने तिच्या मानसिक आजाराबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की, ती डिप्रेशनशी झुंज देत आहे. जेव्हा ती स्वतः यातून बाहेर आली, तेव्हा ती ‘लिव्ह-लव्ह-लाफ’ची स्थापना करत या संस्थेच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त लोकांना मदत करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्री म्हणते ‘तेव्हा आई नसती तर...’
दीपिकाने एका कार्यक्रमात डिप्रेशनबद्दल बोलताना सांगितले होते की, माझ्या आईने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत केली होती. ती म्हणाली, याचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देईन, कारण आईने माझी अवस्था ओळखली होती. माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहायचे आणि प्रत्येक वेळी ते मला भेटायला यायचे तेव्हा मी नेहमीच खंबीर होते. मात्र, माझ्या आयुष्यात एका अस काळ आला होता, जेव्हा मी आतून पूर्णपणे तुटून गेले होते. त्यावेळी मला स्वतःमधील रितेपण जाणवत होते. अनेक दिवस, आठवडे आणि महिने माझ्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी चालू होत्या. अशा स्थितीत आई-वडील मला भेटायला आले होते. त्याचवेळी मी त्यांच्या खोलीत गेले आणि अचानक रडू लागले. मग आईने मला काही प्रश्न विचारले. पण, माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरेच नव्हती. सगळ्यातच शून्यता जाणवत होती.माझ्या आईने हे वेळीच ओळखलं आणि मला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली.
संंबंधित बातम्या