(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood Cricket Movies : 'लगान', 'इकबाल' ते '83'; क्रिकेटवर आधारित हे सिनेमे तुम्ही पाहिलेत का?
Cricket Movies : बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली असून हे सिनेमे क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
Bollywood Cricket Movies : टीम इंडिया विरुद्ध (India Vs Australia) ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनलची (World Cup 2023) सर्वांनाच उत्सुकता आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली असून हे सिनेमे क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यात लगान (Lagaan), 83, शाबास मिट्ठू (Shabaash Mithu) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.
एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni : The Untold Story)
नीरज पांडे दिग्दर्शित 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या सिनेमात धोनीची भूमिका साकारली होती. तर कियारा आडवाणीने साक्षी सिंहचं पात्र साकारलं होतं. दिशा पटानीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. धोनीचं बालपण ते आतापर्यंतचं आयुष्य या सिनेमात दाखवण्यात आलं होतं.
जर्सी (Jersey)
'जर्सी' (Jersey) हादेखील क्रिडाविषयक सिनेमा आहे. गौतम नायडू तिन्नानुरी यांनी या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होते. एका मेहनती पण अयशस्वी झालेल्या एका क्रिकेटरची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली होती.
शाबास मिट्ठू (Shabaash Mithu)
'शाबास मिट्ठू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा श्रीत मुखर्जीने सांभाळली आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. तापसी पन्नूने या सिनेमात मिताली राजची भूमिका साकारली आहे. तापसीच्या करिअरमधला हा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. मिताली राजचा क्रिकेटसाठीचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
83
'83' हा सिनेमा 2021 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा क्रिकेटर कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कबीर खानने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 83 हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.
इकबाल (Iqbaal)
नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'इकबाल' (Iqbaal) हा सिनेमा आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, श्वेता बसू आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय क्रिकेट टीमसाठी खेळण्याची इच्छा असलेल्या एका मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
लगान (Lagaan)
क्रिकेटवर आधारित असलेल्या 'लगान' (Lagaan) या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. आशुतोष गोवारिकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो.
सचिन : अ बिलियन ड्रीम्स (Sachin : A Billion Dreams)
'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' (Sachin : A Billion Dreams) हा सिनेमा क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित आहे. सचिनचं बालपण ते भारताचा क्रिकेट आयकॉनपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
फेरारी की सवारी (Ferrari Ki Sawaari)
'फेरारी की सवारी' (Ferrari Ki Sawaari) हा सिनेमा रुसी नामक एका व्यक्तीवर आधारित आहे.
अजहर (Azhar)
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित 'अजहर' हा सिनेमा आहे. या सिनेमात इमरान हाशमीने अजहरुद्दीनची भूमिका साकारली आहे. त्यांच्या क्रिकेट करिअरमधले चढ-उतार या सिनेमात दाखवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या