News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

'अमर'ला 'अकबर'ची श्रद्धांजली, ऋषी कपूरनी प्रोफाईल फोटो बदलला!

FOLLOW US: 
Share:
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं. 'दयावान' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विनोद खन्ना यांना सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विनोद खन्ना यांच्यासोबत 'अमर,अकबर,अँथोनी' या सिनेमात अकबरची भूमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. अमर, आम्ही तुला विसरणार नाही, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं. इतकंच नाही तर त्यांनी आपला ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरही बदलला. https://twitter.com/chintskap/status/857487443913719808 दुसऱ्या एका ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी एक फोटो शेअर करुन, "तुमच्यासोबतच्या घालवलेल्या यादगार क्षणांच्या आठवणी ताज्या होत आहेत. माझा मित्र बनल्याबद्दल धन्यवाद" असं म्हटलं आहे. https://twitter.com/chintskap/status/857497396569190400 ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनी 'अमर,अकबर,अँथोनी' (1977), चांदणी (1989), 'इना मीना डिका' (1994) आणि 'टेल मी ओ खुदा (2011)' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. https://twitter.com/chintskap/status/857526481869692931 https://twitter.com/chintskap/status/857527840769589248 विनोद खन्ना यांचं निधन बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते. बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली. राजकारणातही सक्रीय विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते. संबंधित बातम्या ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन बॉलिवूडच्या दयावानचा अलविदा विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं? 'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द
Published at : 27 Apr 2017 03:11 PM (IST) Tags: Akbar vinod khanna Rishi Kapoor

आणखी महत्वाच्या बातम्या

Don 3 : इंडस्ट्री सोडण्याच्या तयारी असलेल्या विक्रांत मेस्सीची डॉन 3 मध्ये एन्ट्री, रणवीर सिंहला भिडणार

Don 3 : इंडस्ट्री सोडण्याच्या तयारी असलेल्या विक्रांत मेस्सीची डॉन 3 मध्ये एन्ट्री, रणवीर सिंहला भिडणार

Saif Ali Khan Attack Case: आमच्याकडे पुरावे आहेत, सैफचा आरोपी 'हाच' कोर्टात सिद्ध करू; मुंबई पोलिसांचा दावा, शहजादचे फिंगरप्रिंट मॅच झाले?

Saif Ali Khan Attack Case: आमच्याकडे पुरावे आहेत, सैफचा आरोपी 'हाच' कोर्टात सिद्ध करू; मुंबई पोलिसांचा दावा, शहजादचे फिंगरप्रिंट मॅच झाले?

"KISS करताना तिला वास यायचा", 14 वर्षांनी लहान पत्नीसाठी अभिनेत्याने सोडलं स्मोकिंग

Saif Ali Khan Attack Case : सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना करिनानं दिलीच नाही, लीलावती रुग्णालयातून मिळाली

Saif Ali Khan Attack Case : सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना करिनानं दिलीच नाही, लीलावती रुग्णालयातून मिळाली

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं

टॉप न्यूज़

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश

Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!

Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!

Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा

Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात