Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने वडापाव खाणं का सोडलं? जाणून घ्या...
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितने एका मुलाखतीत वडापाव खाणं का सोडलं याचा खुलासा केला आहे.
Tejaswini Pandit : 'वडापाव' (Vada pav) हा पदार्थ जगभरात लोकप्रिय आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ-मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी वडापाव खात असतात. पण मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) आणि निर्माती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) मात्र वडापाव खाणं सोडून दिलं आहे.
'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान तेजस्विनीला 'मला भूक लागली आहे आणि मला वडापाव खायचा आहे' हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्यास सांगितलं होतं. त्यावेळी तेजस्विनीने भावूक होत हे वाक्य म्हटलं. तसेच वडापाव खाणं का सोडलं याचा खुलासादेखील केला.
तेजस्विनी पंडितने केला खुलासा
तेजस्विनी पंडित म्हणाली,"मी वडापाव खाणं खूप वर्षांपूर्वीचं सोडून दिलं आहे. एका मित्रासाठी मी वडापाव खाणं सोडलं आहे. तो मित्र आता या जगात नाही. खरतर मला आता भूक लागली आहे, पण मी वडापाव खाणार नाही". तेजस्विनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनेक कलाकार डाएटच्या दृष्टीने तेलकट पदार्थ खाणं टाळतात. पण तेजस्विनी पंडितने मात्र एका वेगळ्यात कारणाने वडापाव खाणं सोडलं आहे. कोणत्या मित्रामुळे तेजस्विनीने वडापाव खाणं सोडलं हे अद्याप समोर आलेलं नाही. 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात तेजस्विनीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे.
View this post on Instagram
तेजस्विनी पंडित सध्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तेजस्विनी सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर मुख्य भूमिकेत आहेत.
तेजस्विनी पंडितबद्दल जाणून घ्या...
तेजस्विनी पंडित अनेक दर्जेदार कलाकृतींचा भाग आहे. केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सिनेमांसह तिने मराठी मालिका आणि नाटकांमध्येदेखील काम केलं आहे.
संबंधित बातम्या