एक्स्प्लोर

वेबसफर | बार्ड ऑफ ब्लड : चांगली कथा पण भारत-पाक मसाल्यात फसलेली वेबसीरिज

सप्टेंबर महिन्यात दोन स्पाय थ्रिलर वेब सीरिज आपल्या भेटीला आल्या. त्यापैकी एक म्हणजे अॅमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली 'द फॅमिली मॅन' आणि नेटफ्लिक्स प्रदर्शित झालेली 'बार्ड ऑफ ब्लड' सध्या सर्वजण या दोन्ही सीरिजची तुलना करत आहेत.

स्पाय थ्रिलर चित्रपट किंवा वेब सीरिज बनवण्यात हॉलिवूडच्या दिग्दर्शकांचा हातखंडा आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हा विषय बॉलिवूडमध्येदेखील हाताळला जातोय. त्यात वेबसीरिज नावाचा प्रकार भारतात बाळसं धरू लागल्यानंतर चांगल्या भारतीय स्पाय थ्रीलर वेबसीरिज येऊ लागल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात दोन स्पाय थ्रीलर वेब सीरिज आपल्या भेटीला आल्या. त्यापैकी एक म्हणजे अॅमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली 'द फॅमिली मॅन' आणि नेटफ्लिक्स प्रदर्शित झालेली 'बार्ड ऑफ ब्लड' 'बार्ड ऑफ ब्लड' या वेब सीरिजमध्ये इम्रान हाश्मी एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. इम्रान या सीरिजमध्ये एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. कबीर आनंद असे त्याच्या पात्राचे नाव आहे. ही सीरिज बिलाल सिद्दकी यांच्या 2015 साली प्रकाशित झालेल्या 'दी बार्ड ऑफ ब्लड' या पुस्तकावर आधारित आहे. सीरिजच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर दिसतं. त्यामध्ये म्हटलंय की, "ही वेबसीरिज पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तिशी त्याचा काहीही संबंध नाही." त्यामुळे दिग्दर्शकाने ही वेबसीरिज बनवताना पूर्णपणे सृजनात्मक स्वातंत्र्य घेतलं आहे. या वेबसीरिजची सुरुवात होते बलुचिस्तानमधून. बलुचिस्तानमध्ये आपल्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या 4 गुप्तहेरांना तालिबान कैद करतं आणि या गुप्तहेरांचा वापर करुन पाकिस्तान आणि भारत यांच्याशी सौदा करायचा त्यांचा मनसुबा असतो. तालिबान आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हा मनसुबा पूर्ण होऊ नये, यासाठी कबीर आनंद (इम्रान हाश्मी) इशा खन्ना (शोभिता धुलिपाला) आणि वीर सिंग (विनीत कुमार सिंह) हे एका Unsanctioned Mission वर (परवानगी नसलेलं मिशन किंवा भारताकडून कोणतंही सहकार्य नसलेलं मिशन) बलुचिस्तानमध्ये दाखल होतात. या मिशनवर जाण्यासाठी तीनही गुप्तहेरांची वैयक्तिक कारणं काय असतात? या मिशनसाठी BAF (बलुचिस्तान आझाद फौज - बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना) ची कशाप्रकारे मदत घेतात? पावलोपावली त्यांना येणाऱ्या अडचणी. तिघेही तिथे पोहोचतात का? तालिबानच्या कैदेत असलेल्या भारतीय गुप्तहेरांना सोडवतात का? भारत या Unsanctioned Mission वर गेलेल्या गुप्तहेरांची मदत करतो का? या गोष्टी या बेवसीरिजमध्ये पाहायला मिळतील. 'बार्ड ऑफ ब्लड' का पाहावी? 1. बार्ड ऑफ ब्लड या वेबसीरिजचा बहुतांश भाग हा आऊटडुअर चित्रित केलेला आहे. अनेक प्रसंग हे पाकिस्तान तसेच बलुचिस्तानच्या भागात चित्रित केले आहेत. त्यामुळे सीरिजमधील अनेक प्रसंग वास्तववादी वाटतात. 2. या वेबसीरिजमध्ये वेगवेगळ्या संघटनांची (भारतीय गुप्तचर संघटनेचेदेखील) नावे बदलण्यात आली आहेत. पाकिस्तानमधली दहशतवादी संघटना, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना, इतर देशांच्या गुप्तचर संघटनांची नावं बदलण्यात आली आहेत. परंतु प्रेक्षक म्हणून आपण हे पाहताना अनेक खाऱ्या संघटनांचा इथे संबंध लावतो. अनेक घटनांना, संघटनांना एक्सपोज करण्यात 'बार्ड ऑफ ब्लड' यशस्वी होते. 3. 'बार्ड ऑफ ब्लड'मध्ये बलुचिस्तानवर पाकिस्तानकडून होणारा अत्याचार, त्यातून बलुची लोकांचं उभं राहिलेलं आंदोलन, IAS या पाकिस्तानी एजन्सीचे डावपेच, त्याला भारताने दिलेली उत्तरं या सगळ्यांवर अगदी स्पष्टपणे भाष्य करण्यात आलं आहे. 4. इम्रान हाश्मीने या सीरिजमध्ये खूप चांगला अभिनय केला आहे. इम्रानने त्याची सीरियल किसर नावाची ओळख केव्हाच पुसून टाकली आहे. ही बेवसीरिजदेखील इम्रान आता गुणी अभिनेता झाला आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते. 5. आपल्याकडे काही लोक महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असेच या सीरिजमधील महिला गुप्तहेर ईशा हिच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. परंतु इशा खन्ना (शोभिता धुलिपाला) हिला AK-47 घेऊन तालिबानी दहशतवाद्यांशी लढताना पाहिल्यानंतर लोक महिलांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करणार नाहीत. ज्यांना स्पाय थ्रीलर कंटेन्ट पाहायला आवडतो, त्यांनी एकदा 'बार्ड ऑफ ब्लड' पाहायला हवी. 6. इम्रान, शोभिता, विनीत सिंह, जयदीप अहलावत, कीर्ती कुल्हारी, रजित कपूर, शिशिर शर्मा या सगळ्यांनी उत्तम अभिनय केला आहे. दानिश हुसेन याने साकारलेला मुल्ला खालिद आणि जयदीप अहलावतने साकारलेला आयएएस अधिकारी तन्वीर शहजात ही दोन पात्र लक्षात राहतात. 'बार्ड ऑफ ब्लड' का पाहू नये? 1. बार्ड ऑफ ब्लड ही पूर्णपणे काल्पनिक सीरिज असली तरी, यामध्ये अनेक संदर्भ सत्य घटनेशी संबंधित आहेत. सीरिज बनवताना दिग्दर्शकालाच अनेक संभ्रम आहे, असं वाटतं. अनेक प्रसंग चित्रीत करताना दिग्दर्शक सत्य घटना आणि काल्पनिक कथा यामध्ये गोंधळला आहे, असे जाणवतं. 2. ही सीरिज स्पाय थ्रीलर असली, तरी हॉलिवूडच्या स्पाय थ्रीलर वेबसीरिजच्या तोडीची आहे, असे कुठेही वाटत नाही. तालिबानचा प्रमुख एका छोट्याश्या मशीदीत लपतो. त्याच्याकडे शेकडोंची फौज, पाकिस्तानी पोलिसांचं सहकार्य, पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचं सहकार्य असूनही तीन भारतीय गुप्तहेरांच्या हल्ल्यानंतर पळू लागतो. असे अनेक प्रसंग यामध्ये आहेत, जे की आपल्याला पटणार नाहीत. 3. या सीरिजमध्ये मसाला नाही गाणी नाहीत किंवा हल्ली आपण वेबसीरिजमध्ये पाहातो तितके इंटीमेट सीन्स, किसिंग सीन्स नाहीत. त्यामुळे काही लोकांना 'बार्ड ऑफ ब्लड' आवडणार नाही. 4. बार्ड ऑफ ब्लडमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हाच मसाला पुन्हा एकदा वापरला आहे. हाच प्रकार आपण बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहतो, तसेच गेल्या काही महिन्यात 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीजनमध्ये, 'द फॅमिली मॅन'मध्ये आपण पाहिला. त्यामुळे हाच मसाला पुन्हा एकदा पाहायला लोकांना आवडणार नाही. 5. 'बार्ड ऑफ ब्लड'चा शेवट हा धक्कादायक आहे. अनेकांना हा शेवट पाहून पुढचा सीजन कधी येणार याची उत्सुकता लागू शकते. परंतु हा शेवट काहींना न पटण्यासारखा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटीलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊतRaj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
×
Embed widget