एक्स्प्लोर
राधिका आपटेच्या 'त्या' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या एका आगामी चित्रपटातील सीनने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अजय देवगन निर्मित 'पार्च्ड' या चित्रपटात तिने चक्क न्यूड सीन दिले होते. आता या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे.
या चित्रपटात टॉपलेस राधिका आणि अदिल हुसेन यांच्यातील इंटिमेट सीन काही दिवसांपासून व्हायरल झाले होते. या सीनमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटात अणखीन काय असेल, याबाबत अनेक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून होती.
वास्तविक, या चित्रपटाची कथा राजस्थानातील 'उझास' या एका छोट्याशा गावातील असून चित्रपटात तीन तरुणींनी परंपराविरोधात बंड केलेले दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातून भारतीय स्त्रियांना कशाप्रकारे परंपरेच्या बेडीत अडकवले गेले आहे, यावर परखडपणे भाष्य करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादव यांनी केले आहे. चित्रपटात राधिका आपटेसह सुरवीन चावला, आणि तनिष्ठा चॅटर्जी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हा चित्रपट यापूर्वी इतर देशात प्रदर्शित करण्यात आला. परदेशात या चित्रपटाने 18 पुरस्कार पटकावले. भारतात हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर पाहा:
संबंधित बातम्या
राधिका आपटेचा न्यूड सीन सोशल मीडियावर व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement