एक्स्प्लोर
War Box Office : हृतिक-टायगरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाईचे सर्व विक्रम मोडीत
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू लागली आहे. काल (02 ऑक्टोबर) गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'वॉर' (War) चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
War Box Office Collection day 1 : मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू लागली आहे. काल (02 ऑक्टोबर) गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'वॉर' (War) चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पहिल्या दिवशी 'वॉर'ला बंपर ओपनिंग मिळाली आहे. त्यामुळे 'वॉर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे.
पहिल्याच दिवशी 'वॉर'ने तब्बल 53.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबातची माहिती ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्याचा विक्रम याआधी आमीर खान याच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या नावावर होता. ठग्सने पहिल्याच दिवशी 50.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'वॉर' चित्रपट तब्बल चार हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ह्रतिक आणि टायगर ही गुरु-शिष्याची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. चित्रपटाबद्दल समीक्षकांच्या समीश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
वॉर प्रेक्षकांना कसा वाटला? | मूव्ही रिव्ह्यू
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'वॉर'मध्ये हृतिक आणि टायगर यांच्यासह वाणी कपूर, आशुतोष राणा आणि अनुप्रिया गोएंका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
WAR REVIEW | वॉर : हृतिक वि टायगरTop 5 *Day 1* biz... 2019 releases... 1. #War ₹ 53.35cr [Wed] 2. #Bharat ₹ 42.30 cr [Wed] 3. #MissionMangal ₹ 29.16 cr [Thu] 4. #Saaho [#Hindi] ₹ 24.40 cr [Fri] 5. #Kalank ₹ 21.60 cr [Wed] Nett BOC. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) October 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement