एक्स्प्लोर

विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न?

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे येत्या डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. मात्र या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली न खेळण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे येत्या डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विराट-अनुष्का डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकण्याची शक्यता असली तरी अजून तारीख निश्चित झालेली नाही, असं एक्स्प्रेसने म्हटलं आहे. रोटेशन पॉलिसीनुसार बाहेर श्रीलंकेविरुद्धच्या काही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, असं स्वत: विराटने बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्तही पसरलं होतं. मात्र कोहलीने तशी कोणती मागणी केली नाही, तर वर्षभरात तो खूप क्रिकेट खेळला आहे, त्यामुळे रोटेशन पॉलिसीनुसार त्याला विश्रांती देण्याची शक्यता आहे, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. “या वर्षभरात विराट कोहली अति क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. शिवाय रोटेशन पॉलिसीनुसारही टीम मॅनेजमेंट त्याला विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. कोहलीने स्वत: विश्रांती मागितलेली नाही”, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. या रोटेशन पॉलीसीनुसार विराट ब्रेक घेईल आणि त्यादरम्यानच अनुष्कासोबत लगीनगाठ बांधेल, असं सांगण्यात येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असेल, तर मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी पहिला सामना रंगेल. तर 24 नोव्हेंबरपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राऊंडवर दुसरा सामना खेळवला जाईल. याशिवाय 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. तर 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु होईल. याशिवाय 20 डिसेंबरला टी-20 मालिकेला सुरुवात होईल.

मी नेहमी तुझी काळजी घेईन...’, विराटचं अनुष्काला वचन

दरम्यान, विराट आणि अनुष्काने नुकतंच मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडसाठी नुकतीच जाहिरात केली. या दोघांचं नातं आणि लग्नाची थीम यांचा सुरेख मेळ या जाहिरातीत घालण्यात आला आहे. लग्नावेळी पती-पत्नी एकमेकांना अनेक वचन देतात. त्याच थीमवर आधारित विराट आणि अनुष्कानं मॉर्डन वचनं एकमेकांना दिली आहेत. संबंधित बातम्या ‘मी नेहमी तुझी काळजी घेईन...’, विराटचं अनुष्काला वचन सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर 16 वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Sharad Pawar & Ajit Pawar: मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
Chandrapur: मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं

व्हिडीओ

Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?
Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Sharad Pawar & Ajit Pawar: मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
Chandrapur: मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
Embed widget