Anushka - Virat Welcome Baby | विराट-अनुष्काला शुभेच्छा देताना विराटच्या भावाने केली 'मोठी' चूक, आता दिलं स्पष्टीकरण
विराट (Virat Kohli) आणि अनुष्काला (Anushka Sharma) मुलगी झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय. विराटच्या भावाने या जोडीला शुभेच्छा देताना एक फोटो शेअर केला. पण त्याला त्या फोटोवर स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
मुंबई: अनुष्का शर्माने सोमवारी मुलीला जन्म दिला. ही खुशखबर विराटने त्या दोघांच्याही चाहत्यांना दिली. त्यांनंतर विराट-अनुष्काचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना विराट कोहलीच्या भावाने, विकास कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. पण ही पोस्ट शेअर करताना त्याने एक मोठी चूक केली. त्यावर आता त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
विराटचा भाऊ विकास कोहलीने सोमवारी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये एका नवजात बालकाचे पाय दिसत आहेत. विकास कोहलीने ही पोस्ट शेअर करताना लिहलं होतं की, "आमच्या घरी एका परीचं आगमन झालंय." हा फोटो विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो असल्याची बातमी माध्यमांत वेगाने पसरली.
View this post on Instagram
त्यानंतर मंगळवारी विकास कोहलीने स्पष्ट केलंय की त्याने जो फोटो शेअर केला होता तो विराट-अनुष्काच्या मुलीचा नसून एक रॅन्डम फोटो आहे. त्याने लिहलंय की, "जो फोटो शेअर करण्यात आला होतो तो ओरिजनल नसून रॅन्डम होता. काही माध्यमांनी या फोटोला ओरिजनल समजले. त्यामुळे मी हे स्पष्टीकरण देत आहे."
View this post on Instagram
जेव्हापासून विराट कोहलीने त्यांच्या मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे तेव्हापासून त्यांच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.
संबंधित बातम्या:
- Anushka - Virat Welcome Baby | 'या' आलिशान घरात राहणार विराट- अनुष्काची लाडाची लेक
- Anushka - Virat Welcome Baby | पहिल्या फोटोमागोमाग चर्चा विरुष्काच्या मुलीच्या नावाची; खास व्यक्ती ठेवणार नाव....
- Virat Anushka welcoming Baby Girl : विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', विराटकडून चाहत्यांना खास विनंती
- Anushka - Virat Welcome Baby: विराट-अनुष्काला 'कन्यारत्न', अभिनंदनाचा वर्षाव सुरु