एक्स्प्लोर
Anushka - Virat Welcome Baby | पहिल्या फोटोमागोमाग चर्चा विरुष्काच्या मुलीच्या नावाची; खास व्यक्ती ठेवणार नाव....
अनुष्कानं एका मुलीला जन्म दिल्याची बाब विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली, आणि पाहता पाहत्यां या सेलिब्रिटी जोडीच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी, तिचं नाव जाणून घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली.
Anushka - Virat Welcome Baby हा एक विषय सध्याच्या घडीला सोशल मीडियापासून कला आणि क्रीडा वर्तुळात सर्वांचं लक्ष वेधत आहे. अभिनेत्री (Anushka Sharma) अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांच्या सहजीवनात सोमवारी एका चिमुकलीचं आगमन झालं. पत्नी अनुष्का हिनं एका मुलीला जन्म दिल्याची बाब विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली, आणि पाहता पाहता या सेलिब्रिटी जोडीच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी, तिचं नाव जाणून घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली.
ही उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच 'विरुष्का'च्या लेकीचा पहिलावहिला फोटो व्हायरल झाला. विराटचा भाऊ, विकास कोहली यानं एका लहान बाळाच्या पावलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. जे विराटच्याच लेकीचा फोटो असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आता त्यामागोमागच या चिमुकलीच्या नावाचीही बरीच चर्चा होऊ लागली आहे.
अनेक वेब पोर्टलच्या वृत्तांनुसार विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलीचं नाव 'अन्वी' असं ठेवल्याचं म्हटलं जात आहे. हे त्या दोघांच्याही नावांच्या आद्याक्षरांना जोडून करण्यात आलेलं नाव असल्याचं प्रथमक्षणीच लक्षात येतं. तर, अन्वीचा संस्कृत अर्थ देवी, असाही होतो. देवी महालक्ष्मीचंच एक नाव म्हणून याची वेगळी ओळख आहे.
Anushka - Virat Welcome Baby | 'विरुष्का'च्या मुलीचा पहिलावहिला सुपरक्यूट फोटो व्हायरल
विरुष्काच्या लेकीचं नाव आणि बाबा अनंत महाराज, काय आहे नातं?
सूत्रांच्या माहितीनुसार अद्यापही विराट आणि अनुष्का किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही या नव्या पाहुणीच्या नावाची अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, तरीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती म्हणजे 'अन्वी' याच नावाची.
इतकंच नव्हे, तर असंही म्हटलं जात आहे ती बाबा अनंत महाराज हे अधिकृतपणे तिचं नाव ठेवणार आहेत. बरं या महाराजांचं नाव पहिल्यांदाच सर्वांच्या कानी येत आहे असं नाही. कारण, अनुष्का आणि विराटच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या चर्चा जेव्हा समोर आल्या, तेव्हा अनंत महाराज हे नावही प्रकाशझोतात आलं होतं. लग्नाच्या निर्णय़ापासून ते नव्या घराच्या खरेदीपर्यंतच्या निर्णयात या जोडीला वेळोवेळी या अध्यात्मिक गुरुंनी मार्गदर्शन केल्याचं म्हटलं जातं.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement