एक्स्प्लोर
करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य
![करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य Viral Sach The Alleged First Photo Of Kareena Kapoor Khans Baby करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/21100826/Kareena-Kapoor-Baby-Fake-Photo-Viral-Sach.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि नवाब अभिनेता सैफ अली खान यांनी मंगळवारी मुंबईत एका गोंडस बाळाला जन्म दिला. सैफिनाने आपल्या बाळाचं नाव तैमूर अली खान असल्याचं जाहीर केलं आणि काही वेळातच बाळाचा पहिला वहिला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र हा फोटो खरा आहे खोटा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
करीना हॉस्पिटलमधील बेडवर झोपली असून तिच्या बाजुला नवजात बाळ दिसत आहे. मात्र 'एबीपी न्यूज' आणि करीना कपूरच्या पीआर टीमने या फोटोत कुठलंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा फोटो खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे.
करीनाच्या डिलीव्हरीपूर्वीच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे साहजिकच हा फोटो तथ्यहीन असल्याचं समजतं.
वरील फोटो हा मॉर्फ केल्याचं कोणाच्याही पटकन ध्यानात येईल. हा फोटो करीनाच्या डिलीव्हरीच्या महिनाभर आधीपासूनच व्हायरल झाला होता.
करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता मुलाला जन्म दिला. बाळ आणि आईची तब्येत सुखरुप आहे. जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती.
डिलीव्हरीच्या वेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं. गरोदर असूनही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नव्हता. ती अनेकदा शूटिंग करत होती. तसंच ती अनेक पार्टींमध्येही दिसत होती.
करीना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यावर ‘आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही,’ असंही सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
सैफिनाची लव्ह स्टोरी
2006 साली टशन सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघेजण डेटिंग करत असल्याची कुजबूज सुरु झाली. लडाखमधल्या स्वीमिंग पूलमध्ये शर्टलेस बसलेल्या सैफला पाहून घायाळ झाल्याचं तिनं मान्य केलं. करीनाच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या सैफनं आपल्या हातावर सैफिना असा टॅटूही काढला.
बरीच वर्षे लपून छपून प्रेमप्रकरण निभावणाऱ्या दोघांनी 2007 मध्ये मात्र खुल्लमखुल्ला ऐलान केलं. मनिष मल्होत्राच्या शोमध्ये दोघांनीही आपण प्रेमात असल्याची जाहीर कबुली अख्ख्या मीडियासमोर दिली आणि 2012 साली दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
संसारात रममाण झाल्यानंतरही करीना पडद्यापासून दूर गेली नाही पण पतौडी पॅलेसचा आबही तिनं लीलया राखला. दोन मुलांचा वडील असलेल्या सैफ आणि करीनाचं हे पहिलंच अपत्य आहे. सैफला अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
![करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/21100715/Kareena-Kapoor-Baby-Fake-Photo-Viral-Sach-2.jpg)
संबंधित बातम्या :
करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं....
करीना-सैफच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन
काँग्रॅट्स अंकल, सैफच्या पहिल्या लग्नात करिनाच्या शुभेच्छा
तैमूर अली खान पतौडी, सैफीनाच्या मुलाच्या नावाची चर्चा का?
करिनाचं बाळ मुंबईतच जन्मणार, सासूबाईंनी ठणकावलं
गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो...
सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू
‘मी प्रेग्नंट आहे, मेली नाही’, करीना भडकली
मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)