(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramayana : रणबीरच्या 'रामायण'मध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री; 'या' भूमिकेत झळकणार दाक्षिणात्य सुपरस्टार
Vijay Sethupathi In Movie Ramayana : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीची एन्ट्री होणार आहे.
Vijay Sethupathi In Movie Ramayana : 'रामायण' (Ramayana) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीची (Vijay Sethupathi) एन्ट्री होणार आहे.
'रामायण' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती 'रामायण' या सिनेमात महत्तावाच्या भूमिकेत झळकणार आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी या बिग बजेट सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
विजय सेतुपतीने वाचली 'रामायण'ची स्क्रिप्ट
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात विजय सेतुपतीची एन्ट्री होऊ शकते. नितेश तिवारी यांनी एका भूमिकेसाठी विजयला विचारणा केली आहे. 'रामायण'मध्ये रणबीर कपूर रामाच्या तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आता विजय या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. विजय सेतुपतीने या सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. सिनेमाचं कथानक विजयच्या पसंतीस उतरलं आहे.
View this post on Instagram
'रामायण'च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात (Ramayana Shooting Date Update)
नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांचा आगामी 'रामायण' हा सिनेमा रिलीजआधीपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात नव-नवे अपडेट्स समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी राम आणि सीताच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना VFX पाहायला मिळणार आहे.
विजय सेतुपतीबद्दल जाणून घ्या..
विजय सेतुपतीने केवळ कॉमेडी ड्रामा अथवा थ्रिलर चित्रपटातच काम केलं नाही तर प्रेम कुमार निर्मित चित्रपट '96' मध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विजय सेतुपती हा फक्त अभिनेताच नाही तर तो एक यशस्वी निर्मातादेखील आहे. आज विजयची गणना साऊथच्या सर्वात महागड्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्समध्ये केली जाते.
संबंधित बातम्या