Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गेल्या काही महिन्यांपासून कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) हे आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते.
जाणून घ्या कैकला सत्यनारायण यांच्याबद्दल
कैकला सत्यनारायणा यांनी 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना ते दोन मुली आणि दोन मुलं आहेत. कैकला हे तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रात देखील काम केले होते. त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने महेश बाबू, एनटीआर, यश या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. सत्यनारायण यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कैकला सत्यनारायण हे वृद्धापकाळामुळे विविध आजारांनी ग्रस्त होते. गेल्या वर्षी श्वासाचा त्रास झाल्यानं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कैकला सत्यनारायण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्दर्शक मारुती यांनी सोशल मीडियावर कैकला सत्यनारायण यांचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'देव तुमच्या आत्म्याला शांती देईल. गुरु, तुमची आम्हाला आठवण येईल. '
Rest in peace legend 💔#KaikalaSatyanarayana garu
— Director Maruthi (@DirectorMaruthi) December 23, 2022
We miss you for ever pic.twitter.com/remzBGxvrY
तेलगू चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माते आणि अभिनेते यांनी देखील ट्विटरवर कैकला सत्यनारायण यांचा फोटो शेअर केला आहे.
Legendary actor #KaikalaSatyanarayana garu 🙏 RIP
— BANDLA GANESH. (@ganeshbandla) December 23, 2022
May his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/ZjHUeKHkQ3
अभिनेता नंदामुरी कल्याण रामनं देखील ट्वीट शेअर करुन कैकला सत्यनारायण यांना श्रद्धांजली वाहिली.
Saddened to know about the passing of Kaikala Satyanarayana garu. An absolute legend who immortalised many characters on our Telugu silver screen.
— Kalyanram Nandamuri (@NANDAMURIKALYAN) December 23, 2022
Om Shanti
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: